Wednesday , August 15 2018
Home / ठळक बातमी / ‘ अच्छे दिन ‘ ची फसवणूक? मोदी सरकारच्या विरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून निषेध आंदोलन…

‘ अच्छे दिन ‘ ची फसवणूक? मोदी सरकारच्या विरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून निषेध आंदोलन…

NCP (1)
पुणे : ‘मोदी सरकारला केंद्रात २ वर्षे पूर्ण झाली तरी सामान्य माणसाला दिलासा देण्यात अपयश आल्याच्या निषेधार्थ पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या वतीने खासदार आणि शहराध्यक्ष एड . वंदना चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आज सायंकाळी अलका टॉकीज चौकात निषेध आंदोलन करण्यात आले आणि विविध घोषणांनी चौक दणाणून सोडण्यात आला .

‘एकही भूल ,कमल का फूल ‘ ,’फेक इन इंडिया ‘,या सरकारचं करायचं काय ? खाली मुंडी वर पाय ‘ ‘एप्रिल फूल ,वादे गूल ‘,’हेच का अच्छे दिन ‘ अशा अनेक घोषणांचे फलक कार्यकर्त्यांनी हातात घेतले होते .

महापौर प्रशांत जगताप ,माजी महापौर मोहनसिंह राजपाल ,माजी आमदार कमल ढोले -पाटील ,स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके ,रवींद्र माळवदकर ,प्रदेश सरचिटणीस उमेश पाटील ,अशोक राठी,शहर महिला आघाडी अध्यक्ष रुपाली चाकणकर ,विध्यार्थी आघाडी अध्यक्ष ऋषी परदेशी ,युवक आघाडी अध्यक्ष राकेश कामठे ,नगरसेवक अप्पा रेणुसे ,महेंद्र पठारे ,माजी नगरसेवक काका चव्हाण ,मंगेश गोळे ,अल्पसंख्य आघाडी अध्यक्ष इक्बाल शेख ,डॉ दत्ता गायकवाड ,भोलासिंह अरोरा ,राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस संघटक मनाली भिलारे ,डॉ सुनिता मोरे , किरण बारटक्के इत्यादी उपस्थित होते

NCP (2)

Check Also

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

two × 5 =