Wednesday , August 15 2018
Home / क्रीडा / अद्ययावत तंत्रज्ञानाची ‘गन’ गगनला प्रदान

अद्ययावत तंत्रज्ञानाची ‘गन’ गगनला प्रदान

  • जर्मनीची वॉल्थर कंपनी अॅकॅडमीलाही देणार पाठिंबा

पुणे : ऑलिंपियन नेमबाज गगन नारंग याला रिओ ऑलिंपिकसाठी अद्ययावत तंत्रज्ञान वापरून बनविण्यात आलेली गन वॉल्थर या जर्मन कंपनीकडून समारंभपूर्वक प्रदान करण्यात आली. ट्रीगरच्या स्वरुप आणि वजनात सुधारणा झाल्यामुळे ही गन महत्त्वपूर्ण ठरेल, असे गगनने सांगितले.

 

वॉल्थर कंपनीचे समुह अध्यक्ष डब्लू. एच. प्लाऊमर यांनी गगनला ही गन प्रदान केली. याप्रसंगी सीईओ अलेक्झांडर लेनर्ट आणि मार्केटींग प्रमुख हिशेम हनाफी उपस्थित होते. गगन हीच गन रिओमध्ये वापरणार आहे. त्याने सांगितले की, खेळात साहित्य किंवा साधनसामुग्री महत्त्वाची असतेच, पण त्याहीपेक्षा ती वापरणारा माणूस अर्थात खेळाडू केंद्रस्थानी असतो. गनविषयी अधिक माहिती देताना त्याने सांगितले की, या गनमध्ये इलेक्ट्रॉनिक ट्रीगर आहे. त्याचे वजन 15 ग्रॅमने कमी आहे आणि त्यास आपली पसंती होती. ऑलिंपिकमध्ये इलेक्ट्रॉनिक ट्रीगर असलेली गन प्रथमच वापरणार

 

इलेक्ट्रीर्गटॉनिक ट्ररीगर, 15 ग्रॅम वजन कमी आहे. या गनमध्ये इतक्या वर्षांत ट्रीगरच्या वजनात सातत्य राहिले आहे. नव्या गनने सराव सुरु असून ऑलिंपिकपर्यंत गनची सवय होईल.

 

वॉल्थर कंपनीच्या गनशी भावपूर्ण नाते असल्याचे गगनने नमूद केले. तो म्हणाला की, मी नेमबाजीत कारकिर्द करायची ठरविल्यानंतर आई-वडीलांना घऱ गहाण ठेवले. त्यांनी कर्ज काढून विकत घेऊन दिलेली पहिली गन वॉल्थरचीच होती. आम्हाला 20 वर्षे भाड्याच्या घरात राहावे लागले, पण तेव्हा माझ्याकडे स्वतःच्या मालकीची गन होती.

 

गगनने गन फॉर ग्लोरी ही अॅकॅडमी सुरु केली आहे. पुण्यात अॅकॅडमीचे मुख्यालय आहे. अॅकॅडमी चालविण्यामध्ये वॉल्थर कंपनीचे उत्तम सहकार्य मिळत असल्याचे त्याने आवर्जून नमूद केले. तो म्हणाला की, आतापर्यंत वॉल्थरने 50 गन दिल्या आहेत. त्यामुळे उदयोन्मुख खेळाडूंना चांगली सुविधा मिळाली आहे. त्याचा सरावासाठी फायदा होईल.

 

अॅकॅडमीसंदर्भात अधिक माहिती देताना संचालक पवन सिंग यांनी सांगितले की, अॅकॅडमीची शाखा सुरु करण्यासाठी सतत विचारणा होते, पण कुशल प्रशिक्षक आमच्याकडे पुरेशा संख्येनेे नाहीत. येत्या वर्षाअखेरपर्यंत यातून मार्ग निघेल. 12विविध ठिकाणी अॅकॅडमी सुरु आहेत. महाराष्ट्रात डोंबिवलीमध्ये एक शाखा सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारामुळे गुजरातमध्ये चांगला विस्तार झाला आहे. अहमदाबादमध्ये दोन अॅकॅडमी आहेत. राजकोट, बडोदा, अहमदबादा, जुनागड येथेही शाखा आहेत. गुजरात आणखी तीन केंद्र सुरु करण्यास उत्सुक आहे. याशिवाय तेलंगणा सरकारही नेमबाजीला प्रोत्साहन देण्यासाठी योजनाबद्ध पावले उचलणार आहे. जबलुपूर, भुवनेश्वर, आदी ठिकाणी आमच्या शाखा सुरु आहेत.

 

गगनचे हे कारकिर्दीतील चौथे ऑलिंपिक आहे. इतक्या वर्षांत गन आणि गोळ्यांच्या आयात प्रक्रियेत काय फरक दिसला, या प्रश्नावर तो म्हणाला की, पूर्वी जर्मनीला पोस्टाने पत्र पाठवावे लागायचे. त्यावर उत्तर यायचे. मग कागदपत्रे नेमबाजी महासंघाच्या माध्यमातून क्रीडा मंत्रालयाला सादर करावी लागायची. त्यानंतर संबंधित संचालनालयाकडून परवानगी मिळायची. या सर्व प्रक्रियेची पुर्तता होऊन गन येईपर्यंत एक-सव्वा वर्ष लागायचे. आता मात्र कागदपत्रांची पुर्तता झाली असल्यास दोन-तीन आठवड्यांत गन मिळू शकते.

Check Also

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

thirteen − eight =