Monday , September 24 2018
Home / आज पुण्यात / अपर्णा सेन, सीमा देव आणि उस्ताद झाकीर हुसैन यांचा १५ व्या पिफ अंतर्गत सन्मान

अपर्णा सेन, सीमा देव आणि उस्ताद झाकीर हुसैन यांचा १५ व्या पिफ अंतर्गत सन्मान

(L-R) Aparna Sen, Jorge Arriagada, Ustad Zakir Hussain & Dr. Jabbar Patel (1)
  • १५ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात

  • पुढील सात दिवस रसिकांना मिळणार आंतरराष्ट्रीय चित्रपटांची मेजवानी

  • पिफ बझार अंतर्गत होणार अनेकविध चर्चात्मक कार्यक्रम

  • दिवंगत नेते ओम पुरी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पिफ बझारमध्ये साकारणार ‘ओम पुरी रंगमंच’

पुणे, दि. १२ जानेवारी, २०१७ : पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी होणा-या पुणेआंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून पुण्यात सुरुवात झाली. महोत्सवाचे हे १५ वे वर्ष असून आज डॉ. जब्बार पटेल, डॉ. मोहन आगाशे, अरविंद आणि प्रकाश चाफळकर यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनानंतर बार्बरा एडर दिग्दर्शित ‘थॅंकयू फॉर बॉम्बिंग’ (ऑस्ट्रिया) हा चित्रपट ओपनिंग फिल्म दाखविण्यात आला. तर इंडो – स्पेन मैत्रीला ६० वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर मिस मोनिका, सुब्रता डे आणि कारलॉस ब्लॅन्को यांनी ‘फ्लेमिंको’ हा नृत्यप्रकारही यावेळी सादर झाला.

यावेळी महोत्सवाचे अध्यक्ष आणि संचालक डॉ. जब्बार पटेल सचिव रवी गुप्ता, क्रिएटीव्ह डायरेक्टर समर नखाते, पिफ बझारचे समन्वयक श्रीरंग गोडबोले यांबरोबरच अपर्णा सेन (भारत), प्रो. जेर्झी स्टर (पोलंड), गोरान पास्कलजेव्हिक (सर्बिया), जॉर्ज अरियागाडा (चिली), जेन्स फिशर (स्वीडन), गोवरी रामनारायण (भारत), बेनेट रत्नायके (श्रीलंका) आणि नर्गिस अबायर (इराण)आदी मान्यवर उपस्थित होते.

आज उद्घाटनाच्या वेळी भारतीय चित्रपटसृष्टीत केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री अपर्णा सेन आणि सुप्रसिद्धहिंदी व मराठी अभिनेत्री सीमा देव यांना जीवनगौरव पुरस्कार देत सन्मानित करण्यात आले. याशिवाय संगीत क्षेत्रातील अतुलनीयकामगिरीबद्दल दिला जाणारा यावर्षीचा एस. डी. बर्मन आंतरराष्ट्रीय क्रिएटिव्ह अॅवार्ड प्रख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसैन यांनाप्रदान करण्यात आला.

(L-R) Jerzy Stuhr, Dr. Jabbar Patel, Seema Deo & Bennet Rathnayake (1)

पुरस्काराला उत्तर एताना सीमा देव यांनी आपली आई यांना व् गुरु राजा परांजपे यांना पुरस्कार अर्पण केला. तर अपर्णा सेन यांनी दिवंगत अभिनेते ओम पुरी यांना पुरस्कार अर्पण करत त्यांना मानवंदना दिली. तबलावादक जाकीर हुसैन यांनी आपल्या ख़ास शैलीत पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करत उपस्थितांची मने जिंकली.

दरवर्षी प्रमाणेच यंदाच्या वर्षीही महोत्सवात दाखविल्या जाणा-या चित्रपटांच्या परीक्षणासाठी जगातील निवडक चित्रपट तज्ज्ञांना आमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये अपर्णा सेन (भारत), प्रो. जेर्झी स्टर (पोलंड), गोरान पास्कलजेव्हिक (सर्बिया), जॉर्ज अरियागाडा (चिली), जेन्स फिशर (स्वीडन), गोवरी रामनारायण (भारत), बेनेट रत्नायके (श्रीलंका) आणि नर्गिस अबायर (इराण) यांचा समावेश आहे. हे सर्व परिक्षकही या उद्घाटन सोहळ्यावेळी उपस्थित होते.

(L-R) Dr. Jabbar Patel, Jens Fischer, Gowri Ramnarayan, Aparna Sen & Goran Paskaljevic (3)

याबरोबरच यावर्षीच्या विजय तेंडूलकर मेमोरियल व्याख्यानात चिलीचे जर्ज़ी अरीगेडा हे ‘संगीत ध्वनिंचा चित्रपटात होणारा वापर’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत. तर पिफ बझार अंतर्गत याहीवर्षी व्याख्याने, कार्यशाळा, चर्चासत्रे यांची पर्वणी असेल. यामध्ये माध्यमांतर, कविता, ‘व्हर्च्युअल रिअॅलिटी – फॅड की फ्युचर’ यांसारख्या विविध विषयांवर चर्चा होतील. पिफ बझार अंतर्गत उभे राहणा-या पॅव्हेलियनचे नाव यावर्षी दादासाहेब फाळके पॅव्हेलियन असे असणार असून दिवंगत अभिनेते ओम पुरी यांच्या स्मृती प्रीत्यर्थ यामध्ये असणा-या मुख्य स्टेजचे नामकरण ओम पुरी रंगमंच असे करण्यात आले आहे. तसेच पिफ बझार मध्ये ‘जेम्स ऑफ एनएफएआय’ या विभागाअंतर्गत एनएफएआय मधील चित्रपट पाहण्याची संधीही रसिकांना मिळणार आहे.

यावर्षीही १२ ते १९ जानेवारी दरम्यान पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव भरणार असून पुणे आणि पिंपरीचिंचवड शहरा आठ ठिकाणी१३ स्क्रीन्सवर महोत्सवातील चित्रपट पाहता येणार आहे. यामध्ये सिटी प्राईडकोथरूड, सिटी प्राईड सातारा रस्ता, सिटी प्राईड आर –डेक्कन, मंगला मल्टिप्लेक्स, आयनॉक्सबंडगार्डन रस्ता, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय) आणि चिंचवड येथील कार्निव्हलसिनेमा व आयनॉक्स या चित्रपट गृहांचा समावेश आहे.

Check Also

भाडेकरुंच्या माहितीची पोलीस पडताळणी आता ऑनलाईन

पुणे, दि. 9 डिसेंबर : पुणे पोलीसांनी आता ऑनलाईन जगात आणखीन एक पाऊल टाकले आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

four + 1 =