Sunday , September 23 2018
Home / ठळक बातमी / अबब! सोलापूर जिल्हा परिषदेतील तब्बल १४१ कर्मचारी एकाच दिवशी जन्मले…

अबब! सोलापूर जिल्हा परिषदेतील तब्बल १४१ कर्मचारी एकाच दिवशी जन्मले…

ZP-Solapur home

1 जून 1958 रोजी एकाच दिवशी 141 जण जन्माला आले?

पुणे न्यूज नेटवर्क : जन्मतारखेवरुन ब-याच घटना आपल्या आसपास घडत असताना आपण पाहतो. मात्र सोलापूर मधील जिल्हा परिषदेतील तब्बल १४१ कर्मचा-यांची जन्मतारिख एकच असल्यामुळे अनेक जण आश्चर्य व्यक्त करत आहेत. त्याच झालं असं की, सोलापूर जिल्हा परिषदेतील तब्बल १४१ कर्मचारी एकाच दिवशी म्हणजे मंगळवारी, ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाले.

लहानपणी शाळेत नावनोंदणी करताना विद्यार्थ्यांची नेमकी जन्मतारीख माहीत नसल्यामुळे शाळांमधील गुरूजीच जन्मतारीख निश्चित करत होते. शाळा सुरू झाल्याच्या दिवशी म्हणजे १ जूनची जन्मतारीख निश्चित करण्यात येत होती. आणि त्याप्रमाणेच जन्मदाखले तयार केले जात होते. अशा प्रकारे १ जून रोजी जन्मतारीख असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. ज्यांची जन्मतारीख १ जून रोजी नोंद झाली आहे असे कर्मचारी ३१ मे रोजी वयाची ५८ वर्षे पूर्ण झाल्याने सेवानिवृत्त होतात. अशा लोकांची संख्या मोठी असल्यामुळे दरवर्षी ३१ मे रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना तेवढय़ाच मोठय़ा प्रमाणात निरोप दिला जातो.

सोलापूर जिल्हा परिषदेतील निवृत्त झालेल्या कर्मचा-यांची विभागिय संख्या खालील प्रमाणे :

प्राथमिक शिक्षण विभाग – ८९ कर्मचारी सामान्य प्रशासन विभाग – १६ कर्मचारी आरोग्य विभाग – १४ कर्मचारी बांधकाम विभाग – ११ कर्मचारी ग्रामपंचायत विभाग – ५ कर्मचारी अर्थ विभाग – ३ कर्मचारी महिला व बालकल्याण विभाग – २ कर्मचारी

 

Check Also

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

11 + 16 =