Wednesday , August 15 2018
Home / आरोग्य / आणि पुण्यात महिलेने बसमध्येच बाळाला दिला जन्म…

आणि पुण्यात महिलेने बसमध्येच बाळाला दिला जन्म…

PMPML Bus1

पुणे न्यूज नेटवर्क : बसमध्येच एका महिलेने बाळाला जन्म दिल्याची घटना पुण्यात घडली आहे. पुणेकरांच्या जागरुकतेमुळे आणि संवेदनशिलतेमुळे एका महिलेसह बाळदेखील सुखरुप आहेत. पीएमपीएमएल बसमध्ये एका महिलेची प्रसुती झाली असून महिला आणि बाळ दोन्हीहि सुखरुप आहेत.

पुणेकरांच्या सहिष्णूतेमुळे तसेच महिला बस कंडक्टरच्या जागरुकतेमुळे एका महिलेची बसमध्येच सुखरुप प्रसुति झाली. दुष्काळामुळे हि महिला आपल्या पतीसह लातूरहून रत्नागिरीला मजूरी काम करण्यासाठी गेली होती. मात्र गरोदरपणात नववा महिना लागल्यामुळे ती आपल्या आईकडे पुण्यात आली होती. स्वारगेट येथे आल्यानंतर सुरुवातीला महिला रिक्षातून भोसरी येथे जायला निघाली मात्र रिक्षातून भोसरीला जायला वेळ लागेल असे सांगत रिक्षावाल्याने त्या महिलेला पीएमपीएमएल बस स्टॉपवर सोडले. इतकचं नव्हे तर या रिक्षावाल्या काकांनी त्या महिलेची अवस्था पाहून तिला बसमध्ये बसवून दिले तसेच कंडक्टरला तीची अवस्थादेखील सांगितली.

बसच्या प्रवासामुळे महिलेची प्रसुती बसमध्येच होण्याची शक्यता निर्माण झाली. त्यामुळे बसमधील सगळे पुरुष प्रवासी खाली उतरले आणि महिला प्रवाशांनी त्या महिलेला मदत केली. जवळच असलेल्या एका सरकारी दवाखान्यात तिला तात्काळ दाखल करण्यात आले. या महिलेला याआधी चार मुली आहेत… आणि आता बसमध्येच मुलाचा जन्म झाला. मुलगा आणि स्वत: सुखरुप असल्यामुळे या मातेचा आनंद गगनात मावेना.

पुण्यात पीएमपीएमएल बसमध्ये महिलेची प्रसुती होण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. याआधीदेखील हडपसर भागात एका महिलेने बसमध्येच बाळाला जन्म दिला होता. मात्र जागरुक आणि संवेदनशिल पुणेकरांच्या माणूसकीचे दर्शन यानिमिक्ताने पहायला मिळाले.

 

Check Also

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

fifteen + 15 =