Wednesday , August 15 2018
Home / ठळक बातमी / ‘आदित्य प्रतिष्ठान’चा ‘लक्ष्मी-वासुदेव कलाभूषण पुरस्कार’ पंडित जसराज यांना जाहीर

‘आदित्य प्रतिष्ठान’चा ‘लक्ष्मी-वासुदेव कलाभूषण पुरस्कार’ पंडित जसराज यांना जाहीर

PANDIT_JASRAJ

पुणे, दि. 4 एप्रिल : पुण्यातील आदित्य प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा ‘लक्ष्मी-वासुदेव कलाभूषण पुरस्कार’ मेवाती घराण्याचे संगीतमार्तण्ड पंडित जसराज यांना जाहीर झाला आहे. येत्या शुक्रवारी दिनांक 8 एप्रिल रोजी गुढी पाडव्याच्या दिवशी टिळक स्मारक मंदिर येथे सायंकाळी 5 वाजता पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. आदित्य प्रतिष्ठानच्या वतीने गुरुदेव शंकर अभ्यंकर हे पंडित जसराज यांना पुरस्कार अर्पण करणार असल्याची माहिती आदित्य प्रतिष्ठानच्या कार्यकारी विश्वस्त सौ. अपर्णा अभ्यंकर यांनी दिली.

सन्मानपत्र, सरस्वती चिन्ह, सव्वा लाख रुपये रोख रक्कम, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्काराचे वितरण झाल्यानंतर गुरुदेव शंकर अभ्यंकर पंडित जसराज यांच्याशी विशेष संवाद साधणार आहेत. यानंतर पंडित जसराज यांचे शिष्य श्री. संजीव अभ्यंकर यांचे सुश्राव्य गायन होणार आहे.

Shankar Abhyankar
विद्यावाचस्पति शंकर अभ्यंकर

भारतीय संतांचे विचार आणि अध्यात्म समाजापर्यंत योग्य स्वरूपात पोहोचवण्याचं महत्त्वाचं आणि सात्विक कार्य “आदित्य प्रतिष्ठान” ही पुण्यातील नामांकित संस्था गेली 32 वर्षे करीत आहे. ‘आदित्य प्रतिष्ठान’तर्फे लोणावळ्याजवळ तेहतीस एकर जागेत जगातील पहिले संत विद्यापीठ साकारले जात आहे. देशातील प्रत्येक प्रांतातील संतवाङ्मयाचे येथे जतन केले जाणार आहे. आदित्य प्रतिष्ठानचा यंदा 33 वा वर्धापनदिन आहे.

संस्कृतीची अष्टांगे (धर्मकारण, राष्ट्रकारण, अर्थकारण, समाजकारण, शिक्षण, कला, विज्ञान आणि वाड्गमय) ज्या व्यक्ती आपल्या प्रचंड कार्याने समृद्ध करतात, त्यांना आदित्य प्रतिष्ठानतर्फे “लक्ष्मी-वासुदेव पुरस्कार” देउन सन्मानित करण्यात येते.

B G Associates

आजपर्यंतचे लक्ष्मी-वासुदेव पुरस्काराचे मानकरी :-

2009 – धर्मभूषण – ब्रम्हलीन प.पू. स्वामी वरदानंद भारती, अर्थभूषण – कै. मा. दाजीकाका गाडगीळ

2010 – कलाभूषण – कै. भारतरत्न पं. भीमसेन जोशी, वाड्मयभूषण – मा. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

2011 – भारतभूषण – भारतरत्न लता मंगेशकर

2012 – विद्याभूषण – योगाचार्य कै. बी. के. एस्. अय्यंगार

2013 – राष्ट्रभूषण – हिंदुह्रदयसम्राट कै. बाळासाहेब ठाकरे

2014 – समाजभूषण – श्री. प्रकाश व सौ. मंदाताई आमटे

2015 – स्त्री-शक्ती गौरव पुरस्कारकलाभूषण – श्रीमती प्रभाताई अत्रे, समाजभूषण – श्रीमती सिंधूताई सपकाळ, अर्थभूषण – श्रीमती उषामावशी कुलकर्णी, विज्ञानभूषण – श्रीमती रोहिणी गोडबोले

 

 

Check Also

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

twelve + 15 =