Sunday , September 23 2018
Home / ठळक बातमी / ‘इतिहास फिरस्ती’च्या कार्यक्रमात “उलगडला पुरंदरचा इतिहास!”

‘इतिहास फिरस्ती’च्या कार्यक्रमात “उलगडला पुरंदरचा इतिहास!”

पुरंदर पर्यावरण आणि जलस्त्रोत संरक्षण प्रेरणा या फेसबुक ग्रुपच्या वतीने सासवड येथे कार्मक्रम पार पडला…

sas4

पुणे न्यूज, दि. २० मार्च : “पुरंदरच्या  पवित्र भूमीने अनेक  वीरपुत्र निर्माण केले. या भूमीचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहचावा. अनेक ठिकाणी वाडे आहेत, विरगळ आहेत, मूर्ती आहेत त्यांचा इतिहास लोकापर्यंत पोहचावा. त्यांच्या जतनासाठी लोकांमध्ये ऊर्जा निर्माण व्हावी. यासाठी हि छोटी मोहीम हाती घेतल्याचे पुरंदर पर्यावरण आणि जलस्त्रोत संरक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेशकुमार झेंडे यांनी इतिहास फिरस्ती या संकल्पनेची सर्वांना माहिती दिली. दर महिन्याच्या एका रविवारी इतिहास फिरस्ती आयोजित केली जाते.

 

पुरंदर पर्यावरण आणि जलस्त्रोत संरक्षण प्रेरणा या फेसबुक ग्रुपने “इतिहास फिरास्ती”चे  सासवड येथे आयोजन केले होते. यावेळेस इतिहास प्रेमींनी भैरवनाथ मंदिर, आबासाहेब पुरंदरे वाडा, श्री पुरंदरे वाडा या स्थळांना भेट दिली. या कार्यक्रमाची सुरवात कुंडलिक पाटोळे यांनी महाराष्ट्र गीताने केली. पुरंदरचे जेष्ठ इतिहासकार श्री. शिवाजीराव एक्के यांनी  जमलेल्या इतिहासप्रेमीनां शिवभूमी पुरंदरची शौर्य गाथा सांगितली.

भैरवनाथ मंदिरातील घंटा वसईच्या युद्धात जिंकलेली असून ती सरदार पिलाजी जाधवराव यांनी भैरवनाथ चरणी अर्पण केली. हारजीराजे जगताप यांनी सात वाड्यांचे मिळून सासवड वसवले. त्यावेळेस या वाड्यामधले देव भैरवनाथ मंदिरात प्रतिस्थापना केले. पुरंदरे वाडा १७१० साली अंबाजी पंत पुरंदरे यांनी बांधलेला आहे. अंबाजी पंत पुरंदरे हे पेशवे काळातील मोठे मुसद्दी असल्याची माहिती एक्के सरांनी सांगितली. यावेळेस एक्के सरांनी सर्वांना मराठेशाहीत निर्माण झालेल्या वाड्याची रचना समजावून सांगितली. आबासाहेबांच्या वाड्यानंतर सुनील पुरंदरे यांच्या राहत्या वाड्यास इतिहास प्रेमींनी भेट दिली. यावेळेस सुनील पुरंदरेनी सर्वांचे स्वागत केले. उपक्रमाची तोंड भरून स्तुती केली. या वाड्याची माहिती दिल्यानंतर शिवाजीराव एक्के सरांनी “पुरंदरचे धुरंधर”  या प्रकशित होऊ घातलेल्या ग्रंथांची माहिती उपस्थितांना दिली. कवी शुभानन चिंचकर, कवी अरविंद इंदलकर यांनी कवितांचे सादरीकरण केले.

इतिहास फिरास्तीच्या वतीने वकील विश्वास पानसे यांनी उपस्थित मान्यवर व जयसाहेब पुरंदरे, सुनील पुरंदरे यांचे आभार मानले. मोहन बागडे यांनी इतिहास प्रेमीच्यावतीने सातत्याने इतिहास फिरास्तीचे आयोजन करणाऱ्या पुरंदर पर्यावरण आणि जलस्त्रोत संरक्षण प्रेरणा आणि इतर मान्यवरांनां पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. श्री. संजय काटकर यांनी सामुहिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता केली. यावेळी परशुराम देशमुख, गणेश बागडे, किशोर बोत्रे, गोळे सर, मासाळ सर, अभय सस्ते, अभिजित लांडगे, मिलिंद मारणे, हेंद्रे, अरविंद म्हेत्रे, कटके सर उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी या उपक्रमाची तोंड भरून स्तुती केली.

Check Also

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

19 + six =