Wednesday , August 15 2018
Home / आरोग्य / इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसीन अँड लॉ बद्दल अधिक जाणून घ्या

इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसीन अँड लॉ बद्दल अधिक जाणून घ्या

Medical-Legal-Lawइन्स्टिट्यूट ऑफ मेडिसीन अँड लॉ (आयएमएल) ही संस्था वैद्यकीय कायद्यांबद्दल शिक्षण, माहिती आणि संबंधित सेवा पुरवते. कृती करण्यायोग्य आयएमएलचा आशय आणि विश्लेषण हे डॉक्टर, रुग्णालये आणि वकिलांना विविध माध्यमांतून प्रत्यक्ष वेळेवर वितरित केले जातात.

आयएमएल ही वैद्यकीय कायद्यांबाबत भारतातील प्रमुख तज्ज्ञ संस्था आहे. तिची विस्तृत ज्ञान बँक सतत ताज्या घडामोडींनी अद्यतन केली जाते आणि आरोग्य सेवादात्यांच्या फायद्यासाठी वैद्यकीय कायदेशीर उपाय पुरविण्याकरिता तिचा कमाल वापर करण्यात येतो.

आयएमएलने औषधांशी संबंधित कायदेशीर मुद्यांची निश्चिती करण्यासाठी, त्यांवर उघड चर्चा करण्यासाठी व त्यांवर उपाय सुचविण्यासाठी सर्वप्रथम ‘ नॅशनल कन्वेन्शन ऑन मेडिसीन अँड लॉ’चे (www.medicineandlawconvention.com) आयोजन केले होते. डॉक्टर, वैद्यकीय संघटना, रुग्णालये, वकील, न्यायाधीश, नियामक आणि धोरणकर्ते हे या उपक्रमाचा भाग होते.

आयएमएल ही आयएमए, एएसआय, एफओजीएसआय, एपीआय,आयओए, आयआरआयए, एआयओएस, आयएसए, आयएससीसीएम आणि सीएसआय व अन्य प्रमुख  राष्ट्रीय वैद्यकीय संघटनांसोबत मिळून रुग्णसंमतीचे धोरणनिवेदनाचा (एसओपी ऑन पेशंट्स कन्सेंट) (www.patientsconsent.com)मसुदा तयार करून त्याचा अंगीकार करण्याच्या वार्षिक उपक्रमाचे आयोजन करत आहे. भारतातील रुग्णांच्या संमतीबाबत प्रमाण, सर्वसमावेशक आणि वैध दस्तावेज म्हणून या वक्तव्याचा आज स्वीकार झालेला आहे.

Check Also

रुग्णालये रुग्णांना स्वतःच्या दुकानातून औषधे खरेदी करण्यासाठी सक्ती करू शकत नाहीत;

 सरकारी रुग्णालयांच्या रुग्णांना खासगी नर्सिंग होम्सकडे पाठविणाऱ्या डॉक्टरांना दंड होऊ शकतो पुणे, 11 मार्च: शेनार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

one × 2 =