Wednesday , August 15 2018
Home / ठळक बातमी / उष्ण लहरींचा राज्यामधे ‘रेड अलर्ट’

उष्ण लहरींचा राज्यामधे ‘रेड अलर्ट’

Heat

पुणे न्यूज़ नेटवर्क- हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढल्यामुळे घामांच्या धारा लागत आहेत. वाढलेला उष्णतेचा तड़का काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाहीे. त्यातच राज्यामधील बऱ्याच भागामध्ये वाढलेल्या उष्णलहरींची व्याप्ती पुढील पाच ते सात दिवसांत अजुन वाढणार आहे. 17 ते 21 में च्या दरम्यांन हवेतील उष्ण लहरींचे प्रमाण आणखीन वाढणार असल्यामुळे आपत्ति व्यवस्थापन विभागाकडून सर्व प्रशासकीय यंत्रणांना पत्र पाठवुन नागरिकांना उपाय योजना करण्याचे आवाहन करण्यातचे आदेश देण्यात आले आहे.यामध्ये  उष्णलहरी पासून बचाव करण्यासाठी काही उपाय सुचवण्यात आले आहेत.

उष्णलहरीं पासून बचाव करण्यासाठी काय करावे…
* श्यक्यतो सकाळी सगळ्या कामांचा निपटारा करावा.
* दुपारी 12 ते 3 वाजे पर्यन्त बाहेर पड़ने टाळावे.
*तहान लागलेली नसली तरी जास्तीत ज्यास्त पाणी प्या
* बाहेर जाताना हलकी, पातळ सूती कपडे घालावेत. तसेच गॉगल्स, छत्री, बूट यांच्या वापर करावा.
* बाहेर जाताना पाण्याची बाटली सोबत घ्यावी. उन्हामधे काम करायचे असल्यास डोक, मान,चेहरा ओल्या कपडयाने झाकावा.
*अति उष्णतेमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते त्यामुळे घरी बनवलेले शरबत, तोरणी, ताक लस्सी प्यावी.
* अशक्तपणा, डोके दुखी, स्थूळपणा जाणवत असेल तर उष्णतेचा झटका ओळखून तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
* घर थंड ठेवण्यासाठी पंखे, शटर, पडदे, सनशेडचा वापर करवा.

काय करू नये…
*शरीरात पाण्याचे प्रमाण कमी करणारी कॉफी, चहा, मद्य, कार्बोनेटेड शीत पेय यांचा वापर टाळावा.
*लहान मुलानां बंद असलेल्या व पार्क केलेल्या वहनांमध्ये ठेवु नये.
* गडद, घट्ट, जाड कपडे घालण्याचे टाळा.
* बाहेर तापमान ज्यास्त असल्यास शाररिक श्रमाची
कामे टाळावीत. श्यक्यतो दुपारी 12 ते 3 वाजे पर्यन्त बाहेर जावु नये.

Check Also

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

4 × five =