Wednesday , August 15 2018
Home / आज पुण्यात / एका ह्रदयाचा प्रवास… (ग़्रीन कॉरिडॉर) [Video]

एका ह्रदयाचा प्रवास… (ग़्रीन कॉरिडॉर) [Video]

रुबी हॉस्पिटल ते पुणे विमानतळ ७.५० किलोमीटरचा प्रवास अवघ्या ६.३० मिनीटात

पुणे न्यूज, दि. 26 एप्रिल : पुण्यात रस्ते अपघातात मृत्यू झालेल्या तरूणाचे हृद्य दिल्लीला ट्रान्सप्लान्टसाठी एम्स हॉस्पिटलला रवाना करण्यात आले आहे. काल रात्री रूबी हॉल मध्ये रस्ते अपघातात मृत्यू झालेल्या एका मुलाचं हृद्य दान करण्याचा निर्णय त्याच्या पालकांनी घेतला होता. दिल्लीला एम्स रूग्णालयात तातडीने हृद्याची ट्रान्सप्लान्टसाठी गरज असल्याची नोंद करण्यात आली होती. ह्रदय पुण्यात उपलब्ध झाल्याची माहिती मिळाल्यानंतर एम्स चे डॉक्टर विमानाने पुण्यात आले. रूबी हॉस्पिटल मधून दुपारी 2 वाजून ४५ मिनीटाने हे हृद्य एअरपोर्टच्या दिशेने निघाले आणि अवघ्या ६.३० मिनीटामध्ये वाहतूक पोलिसांनी केलेल्या ग्रीन कॉरिडॉरमधून ७.५० किमी अंतर पार करून एअरपोर्टवर पोहोचवण्यात आले. त्याचवेळी एअरपोर्टहून स्पाईस जेट या कंपनीच्या विमानातून ते दिल्लीला पाठवण्यात आले. वाहतूक विभागाचे उपायुक्त, दोन सहाय्यक आयुक्त, अधिकारी आणि ३२ पोलिस कर्मचा-यांनी या संपूर्ण रस्त्यात कुणीही मध्ये येणार नाही याची खबरदारी घेतली. अत्यंत  सुसाट वेगाने हे हृद्य विमानतळावर पोहोचवण्यात आले आहे.

Check Also

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

seventeen − 7 =