Sunday , September 23 2018
Home / गुन्हेगारी / करोड़ोंच्या लोटरीचे आमिष दाखवून फसवणुक करणाऱ्या नायजेरीन तरुणाला अटक

करोड़ोंच्या लोटरीचे आमिष दाखवून फसवणुक करणाऱ्या नायजेरीन तरुणाला अटक

naigerian froud

पुणे न्यूज नेटवर्क : 4 कोटी 92 लाखांची लॉटरी लागल्याचे आमिष दाखवून पुण्यातील एका महिलेची 16 लाख 18 हजारांची फसवणुक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पुणे सायबर क्राईम सेलकडून एका नायजेरीन तरुणाला अटक करण्यात आली आहे.

पुण्यातील फसवणुक झालेल्या महिलेला ई-मेलवरुन मेल आला होत. “तुम्हाला 4 कोटी 92 लाखांची लॉटरी लागली आहे!” पैश्याच्या आमिष्याने महिलेने तात्काळ या ई-मेल ला रिप्लाय दिला. तसेच सोबत नाव, पत्ता, फोन नंबर, बैंक अकाउंटची माहिती दिली. आरोपीने दुसऱ्या दिवशी डॉ.रिचर्ड नावाने फ़ोन करुन सदर महिलेस लॉटरीची रक्कम मिळवण्यासाठी 25 हजार रूपये भरण्यास सांगितले. त्या महिलेने तात्काळ रक्कम भरलीदेखील. त्यानंतर वेगवेगळी कारणे सांगुन तब्बल 15 बैंक अकाउंटचा वापर करत 16 लाख 18 हजार रूपये महिलेकडून घेण्यात आले.

यादरम्यान हा नायजेरियन तरुण पुण्यात येऊन महिलेला भेटला देखील. त्यावेळी त्याने महिलेला एक सुटकेस दाखवली, त्यामध्ये एक सेलो टेपने रॅप केलेली काचेची बॉटल होती. हिरव्या रंगाच्या प्लास्टिकमध्ये रॅप केलेले 16 बंडल होते. सदर बंडल हे डॉलरचे असल्याचे सांगून बंडलमधून चार नोटा काढल्या आणि केमिकलमध्ये धुतल्या. त्यानंतर नोटा धुण्यासाठी लागणारे केमिकल बॉटल फूटल्याचे सांगून तो निघून गेला. त्यानंतर महिलेने बाकीची रक्कम मिळण्यासाठी फ़ोन,  ई-मेल वरुन संपर्क साधन्याचा प्रयत्न केला असता कुठलाही प्रतिसाद न मिळाल्यामुळे आपली फसवणुक केली गेल्याचे महिलेच्या लक्षात आले.

पोलिसांनी तपास करून आरोपीला दिल्लीहुन अटक केली. त्यामुळे शहरात दुस-या कोणाची अशीच फसवणूक झाली आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत.

 

Check Also

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

two × four =