Wednesday , August 15 2018
Home / आज पुण्यात / ‘कलातीर्थ’ पुरस्काराने मराठी चित्रपट श्रुष्टीतील दिग्दर्शकांचा गौरव

‘कलातीर्थ’ पुरस्काराने मराठी चित्रपट श्रुष्टीतील दिग्दर्शकांचा गौरव

Kalathritith puraskar to marathi directorsपुणे न्यूज़ नेटवर्क – मनोरंजनाच्या क्षेत्रात गेली अनेक वर्ष काम करत असलेल्या थर्ड बेल एंटरटेनमेंट संस्थेच्या १३ व्या  वर्धापन दिनानिमित्त अण्णा भाऊ साठे सभागृह येथे ‘कलातीर्थ’ दिग्दर्शन पुरस्कारचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मराठी चित्रपट श्रुष्टीतील नामांकित दिग्दर्शकांचा गौरव करण्यात आला                                 थर्ड बेल एंटरटेनमेंट ह्या संस्थेच्या वतीने गेली अनेक वर्षे मराठी चित्रपट श्रुष्टीमध्ये अतुलनीय कामगिरी करणाऱ्या कलाकार, तंत्रज्ञ मंडळींचा गौरव करण्यात येतो. यंदा १३व्या वर्धापन दिना निमित्त दिग्दर्शन क्षेत्रातील नामवंत ११ दिग्दर्शकांचा गौरव जेष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांच्या हस्ते करण्यात आला, त्यामध्ये गजेंद्र आहिरे, चंद्रकांत कुलकर्णी, मंगेश कदम, केदार शिंदे, मंदार देवस्थळी, समृद्धी पोरे, विजय केंकरे, सतीश राजवाडे, उमेश कुलकर्णी, राजेश देशपांडे, हेमंत देवधर यांचा समावेश होता.Kalathrith awardतसेच पडद्यामागे काम करणाऱ्याच्या छायाचित्रकार , नाट्य व्यवस्थापक , ध्वनी व्यवस्थापक ,आर.जे. वेशभूषाकार यांचा ही पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला.मराठी चित्रपट ज्या पद्धतीने वाटचाल करत आहे ते पाहून समाधान वाटत असल्याची भावना जेष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांनी व्यक्त केली. यावेळी थर्ड बेल एंटरटेनमेंट चे स्वप्निल रास्ते, अवधूत थत्ते, पुष्कर देशपांडे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पुणे शहर महिला अध्यक्षा रूपाली चाकणकर आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच आगामी प्रदर्शित होणाऱ्या “लालबागची राणी” आणि “व्हँनीला स्ट्रॉबेरी & चॉकलेट” ह्या मराठी चित्रपटातील कलाकारांनी कार्यक्रमाला हजेरी लावली.

Check Also

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

thirteen + 9 =