Friday , September 22 2017
Home / ठळक बातमी / ‘कलानुभव चॅरिटेबल ट्रस्ट’च्या वतीने ‘होली के रंग, ठुमरीके संग’ या सांगितीक कार्यक्रमाचे आयोजन

‘कलानुभव चॅरिटेबल ट्रस्ट’च्या वतीने ‘होली के रंग, ठुमरीके संग’ या सांगितीक कार्यक्रमाचे आयोजन

Holi Ke Rang Mailer

पुणे, २२ मार्च :  लवकरच येऊ घातलेल्या होळी पौर्णिमेचे औचित्य साधत पुण्यातील कलानुभव चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ‘होली के रंग, ठुमरीके संग’ या सांगितीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  होळी पौर्णिमा या संकल्पनेवर आधारित असलेल्या या मैफिलीमध्ये किराणा घराण्याचे आघाडीचे गायक पं. कैवल्यकुमार हे शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीत सादर करणार असून हा कार्यक्रम येत्या शनिवारी, २६ मार्च रोजी टिळक स्मारक मंदिर येथे दयान्कली ५.३० वाजता होणार असल्याचे माहिती ट्रस्टच्या अध्यक्षा भारती ब-हाटे यांनी दिली आहे.

Pt. Kaivalyakumar - 2

यावेळी किराणा घराण्याचे आघाडीचे गायक पं. कैवल्यकुमार हे एक तरल सांगीतिक अनुभव आपल्या गायनातून प्रेक्षकांना देतील. आपले वडील पं. संगमेश्वर गुरव यांचे शिष्य असलेल्या पं. कैवल्यकुमार यांच्याकडे अतुल्य व अनेकविध ठुमरींचा खजिना असून राज्याबरोबरच देश- विदेशात झालेल्या त्यांच्या कार्यक्रमांनी रसिक प्रेक्षक नेहमीच मंत्रमुग्ध होत असतात.

Pt. Kaivalyakumar - 3

तसेच या कार्यक्रमादरम्यान सहायक पोलीस आयुक्त भामरे यांच्या हस्ते पंडित कैवाल्याकुमार यांच्या ‘ठुमरी’ या संगीत सीडी चे प्रकाशन देखील करण्यात येईल.

कलानुभव चॅरीटेबल ट्रस्टतर्फे कलाक्षेत्रातील तरुणवर्गाला मार्गदर्शन मिळावे याबरोबरच युवा कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी एक व्यासपीठ मिळावे या उद्देशाने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. युवकांना प्रोत्साहन देण्यासाठीच या ट्रस्टची स्थापना करण्यात आली आहे.

या कार्यक्रमादरम्यान पं. कैवल्यकुमार शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीत सादर करणार असून रोहित मराठे हे हार्मोनियम तर प्रशांत पांडव हे तबल्यावर त्यांना साथसंगत करतील. या कार्यक्रमाच्या प्रवेशिका अत्यंत वाजवी दरात पंचशील, ४२/१६ एरंडवणे, सीड इन्फोटेक लेन, कर्वे रस्त्या समोर या पत्त्यावर उपलब्ध होऊ शकतील. याशिवाय कार्यक्रमाच्या आधी ०० दिवस टिळक स्मारक मंदिर येथेही तिकीटे उपलब्ध असतील.

Check Also

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

nine − nine =