Monday , November 20 2017
Home / ठळक बातमी / केंद्राकडून विधार्थ्यांची ‘नीट’ सुटका

केंद्राकडून विधार्थ्यांची ‘नीट’ सुटका

neet-exam_650x400_51463416889

केंद्र सरकार काढणार वटहुकुम.
एक वर्ष्यासाठी वैद्यकीय प्रवेश सीईटी नुसार.

पुणे न्यूज़ नेटवर्क – गेल्या काही दिवसांपासून नीट की सीईटी? अशा पेचात विद्यार्थी सापडले होते. सर्वोच्च न्यायालयाने ‘नीट’बाबत पुनर्विचार याचिकाही फेटाळल्याने सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांपुढे ‘नीट’चा प्रश्न उभा राहिला होता. त्यामुळे विधार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमावस्ता निर्माण झाली होती.  या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महाराष्ट्रासह देशभरातील लाखो विद्यार्थ्यांची अखेर ‘नीट’च्या फेऱ्यातून सुटका केली आहे. यासाठी केंद्र सरकारने वटहुकुमाच मार्ग वापरत नीट पासुन दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे .

आजच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या वटहुकुमाला मान्यता देण्यात आली असून राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर त्याची अंमलबजावणी होणार आहे. या प्रश्नात हस्तक्षेप करण्याची मागणी वैद्यकीय प्रवेशांसाठी सीईटी घेणाऱ्या सर्वच राज्यांनी केली होती. तसेच बुधवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. किमान पुढची किमान दोन वर्ष राज्यातील विद्यार्थ्यांवर नीटची सक्ती केली जाऊ नये. आशी मागणी त्यांनी केली होती. नीटमुळे राज्याच्या ग्रामीण भागातील ८० टक्के विद्यार्थ्यांवर अन्याय होईल, अशी वस्तुस्थिती फडणवीस यांनी पंतप्रधानांपुढे मांडली .

दरम्यान वटहुकूमाचा मार्ग अवलंबत नीटचा घोळ मिटवण्यात सरकारला यश आले आहे. राज्यांच्या मागणी प्रमाणे दोन वर्षे जरी दिलासा मिळाला नसला तरी किमान ह्यावर्षेसाठी तरी विधार्थी खुश होणार आहेत.

Check Also

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

11 + ten =