Sunday , September 23 2018
Home / ठळक बातमी / केरळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ‘एण्ट्री’

केरळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ‘एण्ट्री’

NCP keral entry

पुणे न्यूज़ – राष्ट्रवादी काँग्रेस हा फक्त महाराष्ट्र पुरता प्रभावशाली आहे, बाहेरील राज्यांमध्ये राष्ट्रवादीची ताकत कमी असल्याची कायम टिका केली जाते. परंतु टिकाकारांना जोरदार धक्का देत. डाव्यांचा गड मानला जाणाऱ्या केरळमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने एण्ट्री केली आहे. पवारांच्या दोन शिलेदारांनी केरळ विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे.

कुट्टनाड मतदारसंघातून थॉमस चांडी यांनी 4891 मतांनी विजय मिळवला आहे. चांडी यांनी काँग्रेस उमेदवार अडव्होकेट जेकब इब्राहम यांचा पराभव केला. तर दुसरीकडे इलथूर मतदारसंघातून ए के ससींद्रन यांनीही राष्ट्रवादीच्या तिकीटावर विजय मिळवला. त्यांनी जनता दल युनायटेड अर्थात जेडीयूच्या किशन चंद यांचा तब्बल 29057 मतांनी पराभव केला.

ऐका बाजुला भाजपला केरळमध्ये निवडणूक जड जात असताना राष्ट्रवादी काँग्रेसने मिळवलेल यश उल्लेखणीय आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने या निमित्ताने केरळमध्ये एण्ट्री मारली आस मानता येईल.

Check Also

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

four × 1 =