Wednesday , August 15 2018
Home / क्रीडा / क्रीडाप्रेमी पालकांमुळेच देशाची शान उंचावली – कपिल देव

क्रीडाप्रेमी पालकांमुळेच देशाची शान उंचावली – कपिल देव

कपिल देव :  पुणे स्पोर्टस एक्स्पोचा सत्काराचा पायंडा कौतुकास्पद

आज ‘पुणे इंटरनॅशनल स्पोर्टस् एक्स्पो’ मध्ये भारताचा लाडका क्रिकेटपटू कपिल देव याने पुण्यातील ‘ब्लेड्स ऑफ ग्लोरी’ या क्रिकेट संग्रहालयाच्या स्टॉलला भेट दिली. विविध क्रिकेटपटूंच्या बॅट हातात घेवून एक षटकार मारण्याचा मोह कपिल देव यांनाही आवरला नाही. त्यांच्यासोबत यष्टीरक्षक म्हणून उभे होते डॉ. विश्वजीत कदम. फोटोमध्ये डावीकडून रोहन पाटे – संस्थापक ब्लेड्स ऑफ ग्लोरी, डॉ. विश्वजीत कदम आणि कपिल देव.

पुणे, दिनांक 7 मे 2016 ः एकेकाळी आपल्या देशात मुलांना खेळण्यासाठी प्रोत्साहन देणारे पालक निर्माण होतील असे कदापी वाटले नव्हते, पण आज हा बदल घडला आहे. अशा पालकांमुळेच क्रीडा क्षेत्रात भारताची शानउंचावली आहे, अशी उत्स्फूर्त भावना पहिले विश्वकरंडक विजेते भारतीय क्रिकेट कर्णधार कपिल देव यांनी व्यक्त केली.

पुणे आंतरराष्ट्रीय स्पोर्टस एक्स्पोतर्फे (पीआयएसई) ऑलिंपियन तसेच आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या पालकांचा सत्कार त्यांच्याहस्ते झाला. प्रमुख संयोजक डॉ. विश्वजीत कदम व्यासपीठावर उपस्थित होते. टेनिसपटू सानियामिर्झाची आई नसीमा, टेनिसपटू प्रार्थना ठोंबरेची आई वर्षा, क्रिकेटपटू झहीरचे आई-वडील झाकिया-बख्तीयार, फुटबॉलपटू सुनील छेत्रीचे वडील केबी छेत्री, हॉकीपटू धनराज पिल्लेची आई अंदालम्मा, स्पेशल ऑलिंपिकचाखेळाडू भरत चव्हाणचे वडील जय यांना कपिल देव यांच्याहस्ते गौरवचिन्ह आणि पदक देऊन सन्मानित करण्यात आले.

या आगळ्यावेगळ्या आणि भावपूर्ण सोहळ्यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रभाषेतून केलेल्या उत्स्फूर्त भाषणात ते म्हणाले की, आपला मुलगा इंजिनीयर, डॉक्टर झाला नाही तरी खेळाडू बनूनही मोठा होऊ शकतो हेपालकांना कळले आहे. त्यामुळेच आपल्या मुलाने सचिन, विराट बनावे असे स्वप्न पाहणारे पालक आज दिसत आहेत. आजचा दिवस अशा पालकांचा आहे. खेळाडूच्या वाट्याला अनेक सत्कार येतात, पण पालकांच्यावाट्याला असा गौरवाचा क्षण दुर्मिळ असतो. हा योग जुळवून आणल्याबद्दल मी पुणे स्पोर्टस एक्स्पोचे अभिनंदन करतो. वास्तविक एखादी मोठी व्यक्ती काही कारणामुळे उपस्थित राहू शकत नसेल तर आमंत्रण येते.माझ्या बाबतीत हेच घडले, पण येथे आल्यामुळे मला खरोखरच आनंद झाला आहे. पुणे स्पोर्टस एक्स्पोने क्रीडा क्षेत्रात एक नवा पायंडा पडला आणि त्याचा साक्षीदार मी होऊ शकलो.

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची मान उंचाविलेल्या खेळाडूंचा गौरव हा होतच असतो, मात्र त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहून त्यांचे मनोबल वाढविणाऱ्या त्यांच्या पालकांचा सन्मान हा क्वचितच केला जातो. आज ‘पुणे इंटरनॅशनल स्पोर्टस् एक्स्पो’ च्या तिसऱ्या दिवशी प्रसिद्ध क्रिकेटपटू व भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांच्या हस्ते आज अशाच काही निवडक खेळाडूंच्या पालकांचा सन्मान करण्यात आला. या कृतज्ञता सोहळ्याच्या वेळी डावीकडून के.बी. छेत्री (सुनील छेत्री यांचे वडील), अंदलम्मा पिल्ले (धनराज पिल्ले यांची आई), झकिया व बख्तर खान (झहीर खानचे आई वडील), विशाल चोरडिया , डॉ विश्वजीत कदम, कपिल देव, नसीमा मिर्झा ( सानिया मिर्झा हिची आई ) , वर्षा ठोंबरे ( प्रार्थना ठोंबरे हिची आई ) , जय चव्हाण ( भारत चव्हाण याचे वडील) .

कपिल देव यांनी स्पोर्टस एक्स्पोच्या संकल्पनेचे कौतूक केले. संयोजकांनी देशभर असे उपक्रम राबवावेत अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

डॉ. विश्वजीत कदम यांनी प्रास्ताविक आणि स्वागत केले. त्यांनी पालकांचा सन्मान करणे हा पीआयएसईचा बहुमान असल्याची भावना व्यक्त केली. ते म्हणाले की, बार्शीसारख्या दुष्काळग्रस्त भागातून प्रार्थना ठोंबरेचातिच्या पालकांच्या पाठिंब्यामुळे उदय झाला. आता हीच प्रार्थना ऑलिंपिकमध्ये सानियासह भारताचे प्रतिनिधीत्व करण्याची अपेक्षा आहे. तिने महाराष्ट्राची आणि देशाची शान उंचावली आहे. बहुसंख्य पालक मुलांना खेळूनको, अभ्यास कर म्हणतात. बख्तीयार खान यांनी झहीर इंजिनीयर असूनही त्याच्या क्रिकेटला प्रोत्साहन दिले. ते पालकांसाठी आदर्श आहेत. केबी छेत्री यांच्या पाठिंब्यामुळेच सुनील तरुण वयात देशाचे नेतृत्व करूशकला. धनराजला घरात अनेक हॉकीपटू असण्याचा फायदा झाला आणि अंदालम्मा यांनी त्याला प्रोत्साहन दिले. स्पेशल ऑलिंपीयन घडविलेल्या जय चव्हाण यांना तर सलाम करावा लागेल.

सत्कार सोहळ्यानंतर क्रीडा समीक्षक सुनंदन लेले यांनी खेळाडू घडविताना आलेल्या अनुभवांविषयी पालकांना बोलते केले. केबी छेत्री यांनी सांगितले की, लष्करात असल्यामुळे सुनीलला उत्तम क्रीडा सुविधा उपलब्धझाल्या. त्याला फुगा दिला तेव्हा हवेत उडविण्याऐवजी खाली ठेवून लाथ मारायचा प्रयत्न त्याने केला. तो पडून डोक्याला लागले, पण त्याच्यातील फुटबॉलपटूंचे अंगभूत कौशल्य आमच्या लक्षात आले.

नसिमा यांनी सांगितले की, सानिया रोज कोर्टवर पाच-सहा तास सराव करते. तंदुरुस्तीसाठी ती विलक्षण प्रयत्न करते. यामुळेच तिला एनर्जी लाभते. दौऱ्यावर असताना हॉटेल ते कोर्ट आणि कोर्ट ते हॉटेल इतकाच दिनक्रमअसतो. त्यामुळे शीस्त अंगी बाणवण्यासाठी वेगळे काही करावे लागले नाही.

वर्षा ठोंबरे यांनी सांगितले की, बार्शीत एकच कोर्ट असल्यामुळे शनिवार-रविवार प्रार्थना सोलापूरला जाऊन सराव करायची. तिच्या खेळासाठी माझे पती गुलाब यांनी नोकरी सोडली. नंतर प्रिसीजन, लक्ष्य आणि सानियामिर्झा अॅकॅडमीची साथ मिळाली. यामुळे प्रार्थना कारकिर्दीत प्रगती करू शकली.

अंदलम्मा यांनी सांगितले की, वडील, काका, भाऊ, असे अनेक जण हॉकी खेळायचे त्यामुळे धनराजला हॉकीची गोडी लागली. त्याने शाळेत जाऊन शिकावे असे वाटायचे, पण तो मैदानावर जाऊन खेळायचा तेव्हा आनंदवाटाचया.

बख्तीयार म्हणाले की, झहीरने इंजिनीयरींगला मेरीटवर प्रवेश मिळविला. मी पालकांच्या मेळाव्याला गेलो. प्रत्येकाला आपल्या मुलाने डॉक्टर-इंजिनीयर व्हावे असे वाटायचे, पण मग इतरांनी काय करायचे, असा विचारमाझ्या मनात आला. माझ्या मुलाने क्रिकेटपटू व्हावे आणि कदाचित तो देशाकडून खेळू शकेल अशी भावना मी बोलून दाखविली तेव्हा अनेक जण हसले. मी मुलाच्या कारकिर्दीशी जुगार खेळलो, पण त्याच्या मेहनतीमुळेफळ मिळाले.

जय चव्हाण यांनी सांगितले की, स्पेशल मुलांच्या उपचाराचा खर्च प्रचंड असतो. हेच जर त्यांना खेळाची गोडी लावली तर अनेक समस्यांवर मात करता येते. यामुळे मुलाला खेळाडू बनविण्याशिवाय आमच्यासमोर कोणतादुसरा पर्यायही नव्हता.

आशिष पेंडसे यांनी आभार मानले.

Check Also

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

16 − 3 =