Friday , December 15 2017
Home / गुन्हेगारी / गाडी भाड्याने लावण्याच्या बहाण्याने परस्पर विक्री करणाऱ्यास अटक

गाडी भाड्याने लावण्याच्या बहाण्याने परस्पर विक्री करणाऱ्यास अटक

tata-indica-

पुणे न्यूज नेटवर्क : ई.सी.आर.एस या बनावट नावाने टूर्स अँड ट्रॅव्हल्स उघडून चार चाकी वाहने कॉल सेंटरला भाड्याने लावण्याच्या बहाण्याने गाड्यांची परस्पर विक्री करणाऱ्या दोन ठगांना पुणे पोलिसांच्या अँटी गुंडा स्कॉडने अटक केली आहे.

रमेश चव्हाण व योगेश टोणपे अशी अटक केलेल्या व्यक्तींची नावे आहेत. या दोघांनी मिळून हिंजवडी, पुणे येथे ई.सी.आर.एस बनावट नावाची टूर्स अँड ट्रॅव्हल्स सुरु केली. सोबत राजू टिळेकर (रा.सोलापूर) या मुख्य सूत्रधाराच्या मदतीने हे दोघे ओळखीच्या लोकांकडून चार चाकी गाड्या कॉल सेंटरला भाड्याने लावतो असे आमिष दाखवत असे. गाडी आपल्या ताब्यात घेतल्या नंतर त्या भाड्याने न लावता परस्पर इतर लोकांना स्टॅंम्प पेपरवर करार करुन विकत असत. या सर्व ठगेगिरीतून आत्तापर्यंत विकलेल्या तब्बल 41 लाख किमतीच्या 8 चारचाकी गाड्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. तसेच या तिंघा आरोपींवर फसवणुकीचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे.

 

Check Also

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

2 + one =