Sunday , September 23 2018
Home / ठळक बातमी / गावच्या पाटलाची पोरगी आणि मासे विकाणारा परशा… वाचा ‘सैराट’ची स्टोरी…

गावच्या पाटलाची पोरगी आणि मासे विकाणारा परशा… वाचा ‘सैराट’ची स्टोरी…

मराठी चित्रपट स्षृटीला नवं वळण देणारा ‘सैराट’

Sairat movie

सध्या तरूणाईला ‘याड लावलय’ ते नागराज मंजुळे यांच्या येणार्‍या नव्या चिञपटाने अर्थात सैराट ने, सोशल मिडीयावर तर या चिञपटाची गाणी सध्या धूमाकूळ घालत आहेत.चिञपटाची कथा ही प्रतेक व्यक्तीला आपल्या आयुष्यात घडलेली कथा आहे असे ट्रेलरवरून जाणवते. आर्ची उर्फ अर्चना पाटील गावतील राजकीय पुढारी घराण्यातील अत्यंत लाडावलेली आणि दबंग मुलगी.. आणि परशा हा गावात मासे विकणार्‍या समाजातील एक साधारण मुलगा, या दोघांच्या प्रेमकथेवर हा चिञपट आधारलेला आहे.लपून-छपून गावात भेटणे,नदीकाठी बसणे अशा दृष्यातून ग्रामीण भागातील मुलांच्या प्रेमाच्या सर्व गोष्टी यात दाखवण्यात आल्या आहेत,ड्रोनच्या सह्हायाने केलेली शुटींग आपल्याला हाॅलीवूड चिञपटातील दृष्याचा आनंद देतो, अत्यंत ग्रामीण भाषाशैली,जबरदस्त डायलाॅग,आणि रिंकूची बुलेट एंट्री प्रेक्षकांच्या शिट्ट्या आणी टाळ्या खाऊन जाते. खोट्या राजकीय प्रतिष्ठेपाई प्रेमास आड येणाऱ्या वडील-भाऊ नातेवाईकांसोबत निर्भिडपणे लढणारी आर्ची, तसे तर आर्ची हे पाञ करणार्‍या रिंकू राजगुरूचा हा पहीला चिञपट आहे.पण तिच्या अभिनयाला दाद द्यायला हवी.अत्यंत नैसर्गिकता तिने या भुमिकेत दाखवली आहे.परशा म्हणजे आकाश ठोसर यानेही आपल्या अभिनयाची कूठे कसर सोडली नाही. या चिञपटाला खरी रौनक आणली आहे ती अजय-अतूल या जोडगोळीने ‘याड लागल’ ‘झिंगाट’ ‘सैराट झाल जी’ असे एकापेक्षा एक अस्सल गावठी शब्द असलेले आणी संगीताच्या तालावर आपोआप पाय थिरकायला लावणारे गाणे या चिञपटात आपल्याला पहायला मिळणार आहेत. अजय-अतूल,नागराज मंजुळे आणि रिंकू-आकाश यांची ही जोडगोळी या चिञपटात नक्की काय करेल ते जाणून घेण्यासाठी 29 एप्रिल रोजी नक्की पहा…

Check Also

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

5 − two =