Wednesday , August 15 2018
Home / गुन्हेगारी / “गावडेवाडी प्रकरण” अल्पवयीन मुलीला फुस लावून पळविले…

“गावडेवाडी प्रकरण” अल्पवयीन मुलीला फुस लावून पळविले…

मंचर पोलीस स्टेशन हद्दित मुली हरवल्याच्या घटना जास्त….

पालकांनी आरोपीची सगळी माहिती देउनसुद्धा तब्बल महिना उलटून गेला तरी पोलीसांना आरोपीचा शोध लागेना…

Manchar Police Station (2)

पुणे न्यूज नेटवर्क : मंचर येथील गावडेवाडी गावात एका अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत मुलींच्या घरच्यांनी मंचर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करून एक महिना झाला असला अद्याप तरि त्या मुलाचा शोध लागलेला नाही. गावडेवाडी येथील एका 17 वर्षीय मुलीला शेजारी राहणा-या एका 32 वर्षीय विवाहित पुरुषाने फुस लावून पळवुन नेले आहे.

गणेश सुनिल मानमोडे (वय 32) असे आरोपीचे नाव आहे. रंगकाम (पेंटीग)ची कामे करणा-या आरोपी गणेशचा पुर्वी विवाह झाला होता मात्र त्याला मुल होत नव्हते. त्यामुळेच त्याने आपल्या मुलीला पळवून नेले आहे, असा आरोप पालक करतायत.

मंचर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अशा प्रकारच्या घटनामध्यें दिवसेंदिवस मोठी वाढ झालेली पहायला मिळत आहे. गेल्यावर्षी अशाच प्रकारे अल्पवयीन मुलींना पळवून नेण्याच्या 6 घटना दाखल झाल्या आहेत. तर यावर्षी मे पर्यंत 6 अल्पवयीन मुलींना पळवून नेण्यात आले आहे. तसेच गेल्यावर्षी तब्बल 23 सज्ञान मुली हरविल्याची तक्रार पालकांनी याच पोलीस स्टेशनला केली आहे.

Manchar Police Station (1)

दरम्यान गावडेवाडीतील एका अल्पवयीन मुलीला पळवून नेण्याची घटना 5 एप्रिल रोजी घडली होती. मुलीच्या पालकांनी त्यानंतर लगेच मंचर पोलीस स्टेशनला धाव घेतली. मात्र नेहमीप्रमाणे सामान्य माणसांना पोलीसांकडून ज्याप्रकारे वागणूक मिळते त्याप्रमाणे वागणूक या कुटुंबियांना मिळाली. तासंतास पोलीस स्टेशनच्या दारात उभे राहणे, उत्तर द्यायला किंवा कोणाला प्रश्न विचारण्याची सोय नाही. तपास अधिका-यांना विचारलं तर म्हणतात कि, मुली संभाळायला येत नाहीत तर जन्माला कशाला घालता? त्याचबरोबर तुम्हीच तपास करा, मुलगी कुठे गेली ते तुम्हीच शोधून आम्हाला सांगा! अशी उत्तर तपास अधिका-यांकडून मुलीच्या पालकांना मिळाली असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.

घटना घडल्यानंतर तब्बल एका आठवड्यानंतर पोलीसांनी मुलीच्या पालकांकडून एफआयआर घेतली. तोपर्यंत फार उशिर झाला होता. आरोपीने आपल्या जवळील मोबाईल बंद करुन ठेवला आहे. त्यामुळे आता तर पोलीसांना आयतेच कारण मिळाले आहे, “आरोपीचा मोबाईल बंद आहे! जोपर्यंत तो मोबाईल पुन्हा सुरु करत नाही तोपर्यंत त्यांचा तपास लागणार नाही” अशी आडमुठी भुमिका पोलीसांनी घेतली आहे. त्यामुळे मुलीचे पालक हतबल झाले आहेत. शिवाय आरोपीची सगळी माहिती पालकांनी जमा करुन पोलीसांकडे देऊनसुद्धा पोलीसांनी ‘एका अज्ञात व्यक्ती’ विरोधात गुन्हा नोंदविल्यामुळे पालकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

सध्या मुलीचे वय 17 वर्ष 3 महिने आहे. त्यामुळे कायद्याप्रमाणे ती अज्ञान ठरते. मात्र ज्यावेळी तीचे वय 18 वर्ष होईल तेंव्हा काय? असा प्रश्न पालकांना पडला आहे. दिवसा मागून दिवस जात आहेत मात्र मुलीचा तपास लागत नाही, म्हणून तीची माउली चिंतातूर झाली आहे. पालकांच्या सगळ्या आशा मावळत चालल्या आहेत. मात्र ढिम्म प्रशासन कायद्याच्या गोष्टीच्या फक्त बाता मारण्यात मश्गुल आहे.

याप्रकरणाचे तपास अधिकारी फौजदार घाडगे म्हणाले की, आम्ही आरोपीच्या आणि मुलीच्या मागावर आहोत. मात्र त्यांचा मोबाईल बंद असल्यामुळे तपास थांबिवला आहे. जेंव्हा त्यांचा मोबाईल सुरु होईल त्यावेळी आम्ही त्यांच्यापर्यंत पोहचू. तोपर्यंत आम्ही दुस-या पद्धतीने तपास करता येतोय का याची चाचपणी करत आहोत.

Check Also

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

19 + 6 =