Wednesday , August 15 2018
Home / ठळक बातमी / जय गणेश युवा प्रतिष्ठानतर्फे औंधमध्ये वृक्षलागवड

जय गणेश युवा प्रतिष्ठानतर्फे औंधमध्ये वृक्षलागवड

IMG_4046

पुणे, दि. ११ मे २०१६ : जय गणेश युवा प्रतिष्ठानच्यावतीने नाना गोपीनाथ वाळके यांच्या 31 व्या वाढदिवसानिमिक्त औंधमध्ये तब्बल 200 वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. औंध-मेडीपॉईंट हॉस्पिटल रोडवरील दुभाजकावर विविध जातीच्या देशी वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. तसेच औंधभागातील वृक्षांना पाणी देण्यासाठी एका टॅंकरची सोय करण्यात आली आहे.

जय गणेश प्रतिष्ठानच्यावतीने नाना वाळके यांच्या वाढदिवसानिमिक्त चार ई-रिक्षांचे, एका पाण्याच्या टॅंकरचा  तसेच अद्यावत प्रसाधन गृहाचा लोकार्पण सोहळा पार पडला.

IMG_4075

औंधचा विकास मोठ्या झपाट्याने होत आहे. उपनगरात अनेक विकासकामे होत असताना पर्यावरणाच्या दृष्टीने झाडांची लागवड होण्याची गरज असण्याबरोबर त्याचे संगोपणदेखील व्यवस्थित राखण्याची जबाबदारी आम्ही जय गणेश प्रतिष्ठानच्या वतीने घेत असल्याचे नाना वाळके यांनी सांगितले. औंधभागात वृक्षांना पाणी देण्याची सोय व्हावी याकरिता आम्ही एक टॅंकर राखीव ठेवला आहे. फक्त झाडांना पाणी देण्यासाठीच या टॅंकरचा उपयोग केला जातो असे नाना म्हणाले.

जय गणेश प्रतिष्ठानच्या मार्फत नानांनी आजवर अनेक समाजपयोगी उपक्रम राबविले आहेत. आपल्या कार्यक्षेत्रातील नागरिकांच्या सोयीसाठी अ‍ॅंब्युलन्स, कचरागाडी, ना नफा ना तोटा तत्वावर लोकांना पिण्याच्या पाण्याचा टॅंकर, तसेच औंधमधील सोसायटीतील लोकांसाठी रेन वॉटर हार्वेस्टींगसाठी लागणारी सामग्री मोफत पुरविण्याची जबाबदारी घेतली आहे.

IMG_4038

Check Also

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

19 − one =