Monday , October 23 2017
Home / आज पुण्यात / डॉ. प्रभा अत्रे यांना “स्वरभास्कर” पुरस्काराने आज गौरविण्यात येणार

डॉ. प्रभा अत्रे यांना “स्वरभास्कर” पुरस्काराने आज गौरविण्यात येणार

dr-prabha-atre

पुणे न्यूज नेटवर्क : भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या स्मृती प्रित्यर्थ पुणे महानगरपालिकेच्यावतीने आज (रविवार) 29 मे रोजी भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रातील आणि किराणा घराण्यातील ज्येष्ठ गायिका पद्मभूषण डॉ. प्रभा अत्रे यांना “स्वरभास्कर” पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. आज सायंकाळी 6 वाजता पर्वती येथील भारतरत्न पंडित भीमसेन जोशी कलादालन येथे हा पुरस्कार सोहळा होणार आहे.

डॉ. प्रभा अत्रे यांना २०१४ चा तृतीय स्वरभास्कर पुरस्कार महापौर प्रशांत जगताप आणि पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्कार प्रदान समारंभानंतर डॉ.प्रभा अत्रे यांच्या मराठी रचनांवर आधारित संगीत कार्यक्रम सादर केला जाणार आहे.

Check Also

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

two × 5 =