Wednesday , August 15 2018
Home / ठळक बातमी / दुष्काळाच्या भीषण झळा पुण्यापर्यंत…

दुष्काळाच्या भीषण झळा पुण्यापर्यंत…

पानशेत परिसरातील शेतमजूरांवर उपासमारीची वेळ!

Panset1

पुणे न्यूज, (विरेश आंधळकर) दि. 13 एप्रिल : संपूर्ण महाराष्ट्र भयंकर दुष्काळी परिस्थितीला समोर जात आहे. विदर्भ, मराठवाडा आणि महाराष्ट्रातल्या काहि भागात खूप भयानक  परिस्तिथी आहे. लातुरला तर रेल्वेने पाणी पुरवठा करण्याची वेळ राज्य सरकारवर आली. विदर्भ, मराठवाड्यापर्यंत असणाऱ्या दुष्काळाच्या झळा आता पुणे परिसरालाही बसत आहेत.

पुणे जिल्ह्यामधील काही खेडी आणि परिसराला दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. शेतकरी राजा तर ह्या दुष्काळाला सामोरे जात आहेच परंतु प्रामुख्याने ज्यांची उपजिवीका शेतीवरच आधारीत आहे त्या मजूरांवरदेखील उपाशी पोटी राहण्याची वेळ आली आहे.

panshet

पुणे जिल्ह्यातील पानशेत भागामधे प्रामुख्याने शेतमजुरी करुन जगणारा शेतमजूर वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. आर्थिक मागासलेपणा, शिक्षणाचा अभाव, सरकारी यंत्रणांकडून केली जाणारी गळचेपी, आधार कार्ड अभावी रेशन दुकानदार धान्य देईना आणि दुष्काळामुळे शेतीमधे काम मिळेना. सर्व बाजूने होणाऱ्या कोंडिमुळे शेतमजूरावर आता उपाशी पोटी झोपण्याची वेळ येत आहे.

B G Associates

शेतमजूरांच्या या संकट समयी पानशेत मधीलच शिवाजी पासलकर हाइस्कूलमधील माजी विद्यार्थी मदतीला धाउन आले आहेत. सामाजिक बांधिलकी म्हणून पानशेत आणि आजूबाजूच्या गावांतील 55 शेतमजूर कुटुंबाना धान्य वाटप करून छोटीशी मदत करण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. या कार्यामध्ये आपला सगळ्यांचे सहकार्य आणि सहभाग खूप आवश्यक आहे.

 

या भीषण संकटामध्ये आपण सर्वजण मदतीचा हात पुढे करुया…

आपल्यालाही काही मदत करण्याची असेल किंवा या  उपक्रमात सहभागी होण्याची इच्छा असेल त्यांनी मंगेश ठाकर यांच्याशी 9096121242 या क्रमांकावर संपर्क साधावा.

 

Check Also

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

4 + 6 =