Sunday , September 23 2018
Home / ठळक बातमी / नगरविकास प्रधान सचिव डॉ नितीन करीर होणार पुणे स्मार्टसिटी अध्यक्ष.

नगरविकास प्रधान सचिव डॉ नितीन करीर होणार पुणे स्मार्टसिटी अध्यक्ष.

Kunal kumar and nitin kareer

एसपीव्हीच्या अध्यक्षपदा वरुण आयुक्त कुणाल कुमार यांची उचलबांगड़ी

पुणे न्यूज़ नेटवर्क- स्मार्ट सिटी योजना राबवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या एसपीव्हीच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र शासना कडून बदल करण्यात आला आहे. एसपीव्ही स्थापन करताना महापालिका आयुक्त हे अध्यक्षपदी राहतील आसा निर्णय सरकार कडून घेण्यात आला होता. परंतु अध्यक्षपदी आयुक्त कुणाल कुमार यांची युक्ती केल्यापासुन ते पालिका कारभाराकड़े दुर्लक्ष करत असल्याची टिका करण्यात येत होती. याच पार्श्वभूमि वर एसपीव्हीच्या अध्यक्षपदा वरुण कुणाल कुमार यांची उचलबांगड़ी करत त्यांच्या जागी नगरविकासचे प्रधान सचिव डॉ नितीन करीर यांची नियुक्ति करण्यात आली आहे.

स्मार्ट सिटीच्या पहिल्या टप्प्यात निवडलेल्या शहरांमध्ये पुण्याचा समावेश करण्यात आला आहे. येत्या काळामध्ये येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकामध्ये स्मार्ट सिटी योजना मैलाचा दगड ठरू शकते. त्यामुळे सगळी कामे योग्य पद्धतीने राबवण्यासाठी प्रशासकीय ,वित्त ,नियोजन ,पायाभूत सुविधा आणि इतर क्षेत्रासाठी काम करणाऱ्या शासन स्तरावरील वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. तसेच कुणाल कुमार यांचा नियुक्तीमुळे निर्माण झालेला वाद ही मिटवण्याचा प्रयत्न करताना सरकार दिसत आहे.

डॉ नितीन करीर हे सध्या महाराष्ट्र सरकारच्या नगरविकास खात्यामध्ये प्रधान सचिव पदावर कार्यरत आहेत.

Check Also

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

9 + five =