Wednesday , August 15 2018
Home / ठळक बातमी / नदीपात्रातील मेट्रोच्या कामाला पर्यावरणप्रेमींचा आक्षेप…

नदीपात्रातील मेट्रोच्या कामाला पर्यावरणप्रेमींचा आक्षेप…

River

पुणे न्यूज नेटवर्क : पुणे मेट्रोबाबत गेल्या अनेक वर्षांपासून अनेक वाद निर्माण केले जात आहेत. पण मेट्रोचे काम काही सुरु होत नाही. आता पर्यावरणप्रेमींकडून मेट्रोच्या नदी पात्रातील मार्गाबद्दल प्रश्न उभे केले जात आहेत.

नियोजित वनाज ते रामवाडी मार्गातील सुमारे साडेतीन किलोमीटर अंतराचा भाग नदी पात्रातून जाणार असल्यामुळे त्यात बदल करावा, अशी मागणी एका याचिकेद्वारे राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे (एनजीटी) करण्यात आली आहे. हरित न्यायाधिकरणाने याचिकेची दखल घेतल्यास शहराच्या मध्य भागातून मेट्रो नेण्याच्या हेतूमुळे तिचा मूळमार्ग बदलण्याचा केलेला प्रयत्न अंगलट येण्याची शक्‍यता आहे निर्माण झाली आहे. त्यामुळे आधीच रखडलेल्या मेट्रोला “अच्छे दिन‘ कधी येणार?” असा प्रश्‍न पुणेकर विचारत आहेत.

माजी खासदार अनु आगा, पत्रकार दिलीप पाडगावकर, आरती किर्लोस्कर आणि सारंग यादवाडकर यांनी अ‍ॅड. असिम सरोदे यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे. हरित न्यायाधिकरणाने याचिका दाखल करून घेतली असून महापालिका, नगर रचना, केंद्र सरकार, दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन (डीएमआरसी), महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि राज्य जैवविविधता मंडळ यांना त्यांचे म्हणणे सादर करण्याचा आदेश दिला आहे. याबाबत पुढील सुनावणी सात जुलै रोजी होणार आहे.

फ़र्गुसन तसेच जंगली महाराज रोडवरुन मेट्रो मार्ग करणे अवघड असल्यामुळे वनाज – रामवाडी मार्गात बदल करण्यात आला होता. त्यानुसार कर्वे रस्त्यावरील सावरकर स्मारकामागे मेट्रोचा मार्ग नदीपात्रात जातो. तेथून महापालिका भवन, नव्या पुलावरून शिवाजीनगर न्यायालयामागे धान्य गोदामाकडे तो वळतो. याच रस्त्यावर डेक्कन, संभाजी उद्यान आणि महापालिका भवन ही मेट्रो स्थानके आहेत. सुमारे साडेतीन किलोमीटरचा मार्ग नदीपात्रातून जाणार आहे. त्यावर एनजीटीमध्ये आक्षेप घेण्यात आला आहे.

‘शहरामध्ये सहा धरणे आहेत, ढगफुटी झाल्यास नदीकाठावरील रहिवाशांची सुरक्षितता धोक्‍यात येणार आहे. त्यात मेट्रो मार्गामुळे असुरक्षिततेत आणखी भर पडेल. नदीपात्रातील अतिक्रमणांची संख्या वाढत असतानाच मेट्रो मार्गामुळे नदीचे अस्तित्त्वच धोक्‍यात येणार आहे. त्यातच प्रारूप विकास आराखड्यातही ब्ल्यू लाइनमध्ये शंभर फूट रुंद रस्ते दर्शविण्यात आले आहेत. हा मार्ग करने म्हणजे न्यायालयाच्या निकालाच्या विरोधात जाणे आहे’ असा आक्षेप घेण्यात आला आहे.

दरम्यान पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांचे नाव न घेता मेट्रोच्या मार्गात बदल करण्याचे कारण राजकीय असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. स्वतःच्या विधानसभा मतदारसंघांतून मेट्रो जावी आणि मतदारांना खूष करावे, यासाठी आमदारांनी त्यात बदल केला असल्याचेही म्हटले आहे. मेट्रोच्या नियोजित मार्गामुळे नदीच्या प्रवाहाला अडथळा येणार असून, जैवविविधताही धोक्‍यात येणार असल्याचे अ‍ॅड. सरोदे यांनी म्हटले आहे.

 

Check Also

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

one × 3 =