Monday , November 20 2017
Home / आज पुण्यात / नदी पात्रामध्ये असणार सीसीटिव्हीची नजर…

नदी पात्रामध्ये असणार सीसीटिव्हीची नजर…

NadiPatra

पुणे न्यूज नेटवर्क : वाढत्या नागरीकीकरणामुळे तसेच शहरात असणाऱ्या सुविधांमुळे आणि झपाट्याने होत असलेल्या प्रगतीमुळे  पुणे स्मार्ट सिटी म्हणून पुढे येत आहे. एका बाजूला शहराचा विकास होत असताना दूसरीकडे वाढत्या लोकसंख्येमुळे शहरातील कचरा व्यवस्थापन करण्यामध्ये अडचणी येत आहेत. महापालिकेकडून कचरा व्यवस्थापनासाठी वेग-वेगळ्या उपाय योजना राबवल्या जात आहेत. तरीही नदी पात्रामधे फेकला जाणारा कचरा आणि बांधकामांचा राडारोडा यामुळे नदी पात्र ख़राब होत आहे. कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई केली गेली तरी नदी पात्रामधे कचरा टाकलाच जातो.NadiPatra1

नदी पात्रामधे कचरा टाकणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी उपाय म्हणून आता महापालिकेकडून नदीपात्रामध्ये सिसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत. पालकमंत्री गिरीष बापट यांनी  यापूर्वीच अश्या प्रकारे सीसीटीव्ही बसवावेत म्हणून पालिकेला सुचना केली होती. परंतु याबाबत महापालिका प्रशासनाकडून सकारात्मक पावले उचलली गेली नाहीत. मागील आठवडयामध्ये झालेल्या मुख्यमंत्री बैठकीमध्ये गिरीष बापट यांनी सीसीटिव्ही बसविण्यात यावे म्हणून सुचना केल्यानंतर आता पालिकेकडून लवकरच सीसीटिव्ही बसवले जाणार आहेत.

 

Check Also

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

20 − 8 =