Wednesday , July 18 2018
Home / ठळक बातमी / ‘पिफ’चा ‘जीवनगौरव पुरस्कार’ यंदा चॅटर्जी व बेनेगल यांना जाहीर

‘पिफ’चा ‘जीवनगौरव पुरस्कार’ यंदा चॅटर्जी व बेनेगल यांना जाहीर

·         प्रसिद्ध संगीतकार उत्तम सिंग यांना ‘एस. डी. बर्मन इंटरनॅशनल अॅवॉर्ड’ जाहीर
·         अॅनिमेशन विभागात सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल राम मोहन यांचाही होणार गौरव

Noted film personality Shyam Benegal
Noted film personality Shyam Benegal

पुणे, ८ जानेवारी : यंदाच्या १४ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ज्येष्ठ अभिनेते आणि कवी सौमित्र चॅटर्जी व प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचा ‘जीवनगौरव पुरस्कार’ देण्यात येणार असल्याची घोषणा महोत्सवाचे अध्यक्ष व संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. याबरोबर प्रसिद्ध संगीतकार उत्तम सिंग यांना कलेच्या क्षेत्रात केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल ‘एस. डी. बर्मन इंटरनॅशनल अॅवॉर्ड’ जाहीर झाला असून अॅनिमेशन क्षेत्रात केलेल्या सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल राम मोहन यांना ‘डीएसके पिफ लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड-२०१६ ईन अॅनिमेशन’ या पुरस्काराने गौरविण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
हे सर्व पुरस्कार गुरुवार दिनांक, १४ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता सिटी प्राईड कोथरूड येथे होणा-या कार्यक्रमात प्रदान करण्यात येतील. अनेक मान्यवर व्यक्ती यावेळी उपस्थित असतील असेही डॉ. पटेल यावेळी म्हणाले.

(L- R) Rajendra Shinde, Tanvi Kulkarni, Ravi Gupta, Dr. Jabbar Patel, Dr. Vidya Yerwadekar, Satish Alekar, Prakash Makdum (2)
(L- R) Rajendra Shinde, Tanvi Kulkarni, Ravi Gupta, Dr. Jabbar Patel, Dr. Vidya Yerwadekar, Satish Alekar, Prakash Makdum

याप्रसंगी पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे सचिव रवी गुप्ता, खजिनदार राजेंद्र केळशीकर, क्रिएटिव्ह हेड  अभिजित रणदिवे, सिम्बायोसिसच्या संचालिका डॉ. विद्या येरवडेकर, डीएसके इंटरनॅशनल कॅम्पसच्या संयुक्त व्यवस्थापकीय संचालिका तन्वी कुलकर्णी, एनएएफआय चे संचालक प्रकाश मकदूम आदी मान्यवर उपस्थित होते.

DSK Distinguished awardee Ram Mohan for his outstanding contribution to Animation
DSK Distinguished awardee Ram Mohan for his outstanding contribution to Animation

यावेळी बोलताना जब्बार पटेल म्हणाले, ”पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दरवर्षी चित्रपट क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या व्यक्तींचा सन्मान केला जातो. याहीवर्षी ही परंपरा

 

कायम ठेवत प्रसिद्ध अभिनेते व कवी सौमित्र चॅटर्जी आणि प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचा ‘जीवनगौरव पुरस्कार’ देत गौरव केला जाणार आहे. पुणेरी पगडी, स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप असेल. याबरोबरच प्रसिद्ध संगीतकार उत्तम सिंग यांना कलेच्या क्षेत्रात केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल ‘एस. डी. बर्मन इंटरनॅशनल अॅवॉर्ड’ तर अॅनिमेशन विभागात सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल राम मोहन यांचाही गौरव केला जाणार आहे.”

 

 

 

The PIFF Awardee Soumitra Chatterjee
The PIFF Awardee Soumitra Chatterjee

 

Noted music composer Uttam Singh
Noted music composer Uttam Singh

Check Also

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

five × one =