Wednesday , August 15 2018
Home / आज पुण्यात / पुणे न्यूज नेटवर्क इंपॅक्ट : ऑनलाइन सेक्स रॅकेट चालविणाऱ्यांवर पुणे पोलिसांची कारवाई….

पुणे न्यूज नेटवर्क इंपॅक्ट : ऑनलाइन सेक्स रॅकेट चालविणाऱ्यांवर पुणे पोलिसांची कारवाई….

 

‘पुण्यात ऑनलाइन सेक्स रैकेट जोरात’ बातमीतून उघड केला होता पुण्यातील हाई प्रोफाइल गोरखधंदा…

Twitter

पुणे न्यूज नेटवर्क / विरेश आंधळकर : गेल्या अनेक दिवसांपासून पुणे पोलिसांनी वेश्या व्यवसाय चालवणाऱ्यांवर कार्यवाहीचा सपाटा लावला आहे. यामध्ये अनेक सेक्स रॅकेट उद्ध्वस्त करत पोलिसांनी यामध्ये अडकलेल्या मुलींची सुटका केली होती. तर दुसऱ्या बाजुला काही दलालांकडून ऑनलाइन सेक्स रॅकेट चालविले जात होते. वेब साइट्स, फेसबुक, ट्विटर, लोकन्टो यांसारख्या सोशल मीडियाचा वापर करुन चालवल्या जाणाऱ्या सेक्स रॅकेटकडे पोलिस यंत्रणेचे लक्ष नव्हते. परंतु सर्वप्रथम पुणे न्यूज नेटवर्कने  ऑनलाइन सेक्स रॅकेटकडे लक्ष वेधत बातमी दिली होती.

viciu-sex-online

त्यानंतर आता पुणे पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक पथकाने दि. 22 में रोजी कार्यवाही करत ‘लोकैन्टो’ या वेबसाइटमार्फत सेक्स रॅकेट चालवणाऱ्या हिरा वराली (वय 19, रा. निगडी) याला गुन्हे शाखेच्या अटक केली आहे. मनोज या नावाची व्यक्ती ‘लोकैन्टो’ वेबसाईटवर जाहिरात करत सेक्स रॅकेट चालवत असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली होती.  त्यानुसार पोलिसांनी छापा टाकत पश्चिम बंगाल येथील एका मुलीसह दोन मुलींची सुटका करण्यात केली आहे.

 

 

 

 

याच बातमीतून उघड केला होता पुण्यातील हाई प्रोफाइल गोरखधंदा…

‘पुण्यात ऑनलाइन सेक्स रैकेट जोरात’ read more – http://goo.gl/VMG8OJ

escort1
‘पुण्यात ऑनलाइन सेक्स रैकेट जोरात’

Check Also

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

three × four =