Monday , September 24 2018
Home / ठळक बातमी / पुणे परिमंडलात 23 हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडीत; तर 5 कोटींचा भरणा

पुणे परिमंडलात 23 हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडीत; तर 5 कोटींचा भरणा

MSEB

पुणे, दि. 11 : महावितरणकडून थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहिम तीव्र करण्यात आली आहे. या मोहिमेत गेल्या फेब्रुवारीमध्ये 23,639 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. यातील 17,685 वीजग्राहकांनी वीजदेयकांच्या 5 कोटी 31 लाखांची थकबाकी व पुनर्जोडणी शुल्क भरल्यानंतर त्यांचा वीजपुरवठा सुरु करण्यात आला आहे.

दरम्यान, सर्व थकबाकीदार वीजग्राहकांना नम्र आवाहन करण्यात येते की त्यांनी थकबाकीच्या रकमेचा भरणा करून वीजपुरवठा खंडित करण्याची अप्रिय कारवाई टाळावी.

पुणे, पिंपरी-चिंचवड शहर तसेच मुळशी, मंचर आणि राजगुरुनगर विभागात थकीत देयक वसुली व थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरु आहे. गेल्या महिन्याभरात 9 कोटी 36 लाख रुपयांच्या थकबाकीपोटी घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक वर्गवारीतील 23 हजार 639 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. यातील 17 हजार 685 ग्राहकांनी 5 कोटी 31 लाख रुपयांच्या थकबाकीचा व पुनर्जोडणी शुल्काचा भरणा केल्यानंतर त्यांचा वीजपुरवठा सुरु करण्यात आला आहे. यात 13940 घरगुती, 3407 वाणिज्यिक, 294 औद्योगिक व इतर 44 वीजग्राहकांचा समावेश आहे. उर्वरित 5954 थकबाकीदारांकडे 4 कोटी 6 लाख रुपयांची थकबाकी असल्याने त्यांचा वीजपुरवठा कायमस्वरुपी खंडित करण्यात आला आहे. यात 4455 घरगुती, 1297 वाणिज्यिक व 130 औद्योगिक व इतर 72 ग्राहकांचा समावेश आहे.

थकबाकीदार वीजग्राहकांनी संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी त्वरीत थकीत देयकांचा भरणा करावा व सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. ग्राहकांना वीज देयकांबाबत काही तक्रार असल्यास व महावितरणच्या संबंधीत कार्यालयाशी संपर्क साधल्यास तक्रारींचे निवारण करण्यात येईल.

Check Also

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

four + 9 =