Monday , September 24 2018
Home / आज पुण्यात / पुणे स्टेशन परिसरात स्वच्छता अभियान

पुणे स्टेशन परिसरात स्वच्छता अभियान

विविध सेवाभावी आणि सामाजिक संघटनांकडून स्टेशन परिसरात स्वच्छतेवर जनजागृती कार्यक्रम

 Pune Railway Cleaning

पुणे न्यूज नेटवर्क : पुणे रेल्वे स्टेशन परिसरात स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत स्वच्छता अभियान राबवण्यात आले. रेल्वे  कर्मचा-यांशिवाय वेगवेगळ्या सेवाभावी आणि सामाजिक संघटनाही या अभियानात सहभागी झाल्या होत्या.

स्वच्छता या अभियानाअंतर्गत श्रमदान, नाटक, बॅनर होर्डिंग या माध्‍यमातून देखील जनजागृति करण्यात आली. शनिवारी (दि.9‌)रोजी पुणे स्टेशनवर संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचे 1000 कार्यकर्त्यांनी स्टेशन परिसरात स्वच्छता केली. रेल्वे स्टेशन परिसराबरोबरच रेल्वे गाड्यांमध्येही स्वच्छता करण्यात आली.  या बरोबरच नाटक आणि साफसफाई विषयक उपक्रम राबवण्यात आले. या फाउंडेशनच्या वतीने महिन्यातील एक दिवस हा उपक्रम राबवला जातो.

रेल्वे प्रबंधक बी. के. दादाभोय, अप्पर मंडल रेल्वे प्रबंधक मिलिंद देउस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात आले. तसेच संयोजन वरिष्‍ठ मंडळ वाणिज्‍य प्रबंधक गौरव झा, मंडळ वाणिज्य प्रबंधक मदनलाल मीना, सहाय्यक वाणिज्य प्रबंधक संजय कुमार, वरिष्‍ठ स्‍टेशन प्रबंधक ए. के. पाठक यांनी केले होते.

Check Also

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

five × three =