Wednesday , August 15 2018
Home / आज पुण्यात / पुणे स्मार्ट सिटी अध्यक्षपदावरून गोंधळ.

पुणे स्मार्ट सिटी अध्यक्षपदावरून गोंधळ.

Pune Corporation building
पुणे न्यूज़ – पुणे स्मार्ट सिटीसाठीच्या एसपीव्ही अध्यक्षपदावरून आयुक्त कुणालकुमार यांना हटवून प्रधान सचिव डॉ. नितीन करार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर आता राजकीय नेते तसेच पुणेकर जनतेची विविध मते पुढ येत आहेत. मनसे आणि शिवसेनेन तर पुण्याने स्मार्ट सिटी स्पर्धेतून बाहेर पड़ण्याची मागणी केली आहे तर सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये संभ्रमावस्ता दिसून येत आहे.

मनसेचा स्मार्ट सिटीला पहिल्यापासून विरोध होता मात्र पुणेकरांच हित लक्षात घेऊन आम्ही पाठींबा दिला. पण आता आयुक्त अध्यक्षपदावर नसल्याने महापालिकेचे उरलेले अधिकारदेखील कमी होणार असल्यामुळे महापालिकेने सिटी स्पर्धेतून बाहेर पडण्याची मागणी मनसेन केली आहे.

तर दुसरीकडे शिवसेनेला स्मार्ट सिटी संचालक मंडळात मताधिक्य कमतरतेमुळे स्थान नाही. त्यामुळे आधीच दुःखी असनाऱ्या सेनेला आयता मुद्दा मिळाला आहे.  स्मार्ट सिटीतुन बाहेर पडण्याचा त्यांचा सल्ला भाजपला बोचणारा ठरणारा आहे.

कुठलीही योजना ही व्यक्तीनिष्ठ नसावी. मुळात स्मार्ट सिटी योजनेत अनेक दोष आहेत. अर्थात पुणेकरणां सोई मिळतील म्हणून आम्ही सहमती दर्शवली होती परंतु आमचा डॉ करीर यांच्या नियुक्तीला आक्षेप असल्याच. अभय छाजेड माजी काँग्रेस शहर अध्यक्ष यांनी सांगितल.

डॉ करीर यांची नियुक्ती संपूर्ण पणे बेकादेशीर आहे.  एसपीव्हीच्या नियमांप्रमाणे आयुक्त,महापौर किंवा विभागीय आयुक्तच अध्यक्ष पाहिजे असल्याच मत  सभागृह नेते यांनी बंडू केमसे यांनी व्यक्त केलय.

एकीकडे सगळी कडून टिका होत असताना भाजपचे गटनेते गणेश बीडकर यांनी  डॉ करीर यांच्यासारख्या हायप्रोफाईल अधिकाऱ्याच्या नियुक्तीचे अपेक्षेप्रमाणे स्वागत केले.

तर दूसरीकड़े महापौर प्रशांत जगताप यांनी या नियुक्तीचे स्वागत करत असताना ठोस अशी भूमिका घेतली नाही. राज्यशासनाने केलेल्या नियुक्तीत महापालिकेला अधिकार नाहीत अस सावध विधान करायला ते विसरले नाहीत.

एकंदरीत पुणे स्मार्ट सिटी योजना होणार की आजुन किती वाद निर्माण होणार हे येणारा काळच सांगेल.

Check Also

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

16 − fourteen =