Sunday , September 23 2018
Home / क्रीडा / पुण्यातील आभाळमायाला विराट कोहलीचा मदतीचा हात

पुण्यातील आभाळमायाला विराट कोहलीचा मदतीचा हात

‘आभाळमाया’ वृद्धाश्रमाला विराट कोहली फाउंडेशन व एबीआयएल फाउंडेशन करणार एकत्रितपणे मदत

Virat Kohli, Dr. Aparna Deshmukh and Amit Bhosle.
Virat Kohli, Dr. Aparna Deshmukh and Amit Bhosle.

पुणे, एप्रिल २१ : भारताचा आघाडीचा फलंदाज विराट कोहली स्वत: तुम्हाला भेटायला येतो, तुमच्याशी गप्पा मारतो, आपुलकीने तुमची विचारपूस करतो… स्वप्नवत वाटणारं हे सारं पुण्यातील ‘आभाळमाया’ वृद्धाश्रमातील वृद्धांनी आज अनुभवलं. स्वत: विराट कोहली याने आज पुण्यातील ‘आभाळमाया’ वृद्धाश्रमाला भेट देत मदतीचा हात पुढे केला. पुण्यातील एबीआयएल फाउंडेशनचे अमित भोसले, आभाळमाया वृद्धाश्रमाच्या संस्थापिका डॉ अपर्णा देशमुख हेही यावेळी उपस्थित होते.

विराटच्या विराट कोहली फाउंडेशन व पुण्यातील एबीआयएल फाउंडेशन यांच्या वतीने सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग येथे असलेल्या या ‘आभाळमाया’ वृद्धाश्रमाला त्यांची सध्याची आर्थिक चणचण दूर करण्याच्या दृष्टीने तात्काळ आर्थिक मदत देऊ करण्यात येणार आहे.

Virat Kohli, Dr. Aparna Deshmukh and Amit Bhosle in an informal conversation during Virat’s visit to Aabhalmaya old age home today.
Virat Kohli, Dr. Aparna Deshmukh and Amit Bhosle in an informal conversation during Virat’s visit to Aabhalmaya old age home today.

यावेळी बोलताना विराट कोहली म्हणाला, “घरातील वडिलधा-या व्यक्तींची काळजी घेणे हे कुटुंबातील सदस्यांचे आणि समाजाचे देखील कर्तव्य आहे. मात्र आज अनेकजण या वडीलधा-या व्यक्तींना ओझं समजत दूर लोटत असतात. असे करणे चुकीचे आहे. अशा ज्येष्ठ आणि निराधार व्यक्तींसाठी डॉ. अपर्णा करीत असलेले हे कार्य अतिशय कौतुकास्पद आहे.’’

डॉ. अपर्णा देशमुख यांनी स्थापन केलेल्या या वृद्धाश्रमात नातलगांनी दूर सारलेल्या ५७ वृद्धांची काळजी घेतली जाते. त्यांची संपूर्ण व्यवस्था या वृद्धाश्रमात करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे २०१० साली सुरू झालेली ही संस्था कोणत्याही सरकारी अथवा संस्थेच्या मदतीशिवाय सुरू आहे. डॉ. अपर्णा यांच्या कमाईतूनच या संस्थेचा सर्व खर्च तर उचलला जातोच याशिवाय या वृद्धांना सर्व प्रकारची वैद्यकीय मदतही यातूनच पुरविली जाते.

ज्येष्ठ क्रीडा समीक्षक सुनंदन लेले व सुरेंद्र मोहिते यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे.

Virat Kohli interacting with a resident of Aabhalmaya old age home. Amit Bhosle of ABIL Foundation and Dr. Aparna Deshmukh
Virat Kohli interacting with a resident of Aabhalmaya old age home. Amit Bhosle of ABIL Foundation and Dr. Aparna Deshmukh

Check Also

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

fifteen − six =