Wednesday , August 15 2018
Home / गुन्हेगारी / पुण्यातील कुख्यात गुंड बापू नायर याला अटक

पुण्यातील कुख्यात गुंड बापू नायर याला अटक

Ganster Bapu Nair

पुणे न्यूज नेटवर्क : गेल्या सहा महिन्यांपासून फरार असलेल्या बापू नायरला अखेर आज पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत. कुख्यात गुंड बापू नायर याला आज (सोमवार) दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. नायर टोळीचा म्होरक्या म्हणून बापू नायर कुप्रसिद्ध आहे.

खुन, खुनाचा प्रयत्न यांसारख्या गंभीर गुन्ह्यासह अनेक गुन्हे नायर टोळीवर आहेत. नायरवर यापुर्वी नायरवर तडीपारीची तीनवेळा कारवाई करण्यात आली आहे. कोंढव्यातील जमीन बळकविल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तसेच काही दिवसांपूर्वीच त्याच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई देखील करण्यात आली आहे.

संयुक्त पोलीस आयुक्त सुनील रामानंद, अतिरिक्त पोलीस आयुक्त सी. एच. वाकडे, पोलीस उपायुक्त पी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कुख्यात गुंड बापू नायर याला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील आणि त्यांच्या पथकाने दिल्ली येथून अटक केली आहे.

Check Also

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

5 + 6 =