Wednesday , August 15 2018
Home / ठळक बातमी / पुण्यातील खास पैठणीच्या रूपातील ‘केक’ सोशल मिडियावर व्हायरल…

पुण्यातील खास पैठणीच्या रूपातील ‘केक’ सोशल मिडियावर व्हायरल…

(फोटो आणि बातमी वाचण्यासाठी क्लिक करा)

पुण्यातील तन्वी सोवनी-पळशीकर यांनी बनविलेला केक सोशल मिडियावर व्हायरल होतोय.

IMG_1388
पुणे न्यूज : पैठणी हा प्रत्येक स्त्रिच्या जिव्हाळ्याचा विषय असतो.  त्यामुळे वाढदिवसाचा केक कुणी पैठणी च्या डिझाईन मध्ये साकारुन तुमच्या समोर ठेवला तर आनंद नक्की होईल ना? पुण्याच्या तन्वी सोवनी पळशीकर या केक डिझाईनर ने नुकताच हा पैठणीच्या घडीचा केक डिझाईन केला आहे. त्या केक ने बर्थडे गर्लला तर वेड लावलंच, पण सध्या या केकचे फोटो सोशल मिडियावर अक्षरश: व्हायरल झाले आहेत. पैठणीचा मोहक पदर, नथ, गजरा, मोत्याचं गळ्यातलं आणि कुड्या हे सगळं तन्वीनं केक वर साकारलं आहे. आणि ते सगळं एडिबल अर्थात खाण्यायोग्य आहे. केकलिअस (cakilicious) नावाने तन्वी यांनी स्वताचा वेगळा ब्रांड तयार केला आहे. स्वतः इंटीरिअर डिझाईनर असलेल्या तन्वी या मुळच्या पुण्याच्या आहेत. केवळ छंद म्हणून तन्वी अशा विविध प्रकारचे केक तयार करतात.

IMG_1389

 

IMG_1390

Check Also

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

12 + 12 =