Monday , September 24 2018
Home / ठळक बातमी / पुण्यात वीज पडून दोघांचा मृत्यू…

पुण्यात वीज पडून दोघांचा मृत्यू…

बंडगार्डन येथील विधानभवन परिसरातील घटना…

pune lightning thunder death1

पुणे न्यूज नेटवर्क : बऱ्याच दिवसांनंतर काल झालेल्या पावसादरम्यान वीज कोसळून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना पुण्यात घडली आहे. बुधवारी संध्याकाळी बंडगार्डन भागातील विधानभवन परिसरात हि घटना घडली.

गौतम लक्ष्मण वीर (वय ५०, रा.आकुर्डी) व बालय्या मार्क पिडथल्ला (वय ६२, रा. घोरपडी) अशी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास अचानक पावसाला सुरुवात झाली तेव्हा रस्त्याने जात असलेले गौतम आणि बालय्या हे दोघेही विधानभवनाजवळील एका झाडाखाली थांबले होते. पोलीस चौकीशेजारीच असलेल्या या झाडावर अचानक वीज कोसळली. त्यामध्ये हे दोघे जागीच ठार झाले.

 

वीज पडल्या पडल्या यामध्ये गंभीर जखमी झालेल्या दोघा जणांना तातडीने पोलिसांनी ससून रुग्णालयात दाखल केले होते. मात्र तपासणी दरम्यान डॉक्टरांनी या दोघांनाही मृत घोषित केले. पोलिसांना दोघांच्याही खिशातील कागदपत्रांमधून तसेच मोबाईलमधून नातेवाइकांची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दोघांच्याही नातेवाइकांना संपर्क साधला.रात्री उशिरा बंडगार्डन पोलीस ठाण्यात दोघांचेही नातेवाईक जमा झाले होते. पोलिसांना या दोघांच्या मृतदेहाजवळ आढळून आलेली एक दुचाकी आणि एक सायकल पोलीस मिळाली आहे.

Check Also

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

five × 1 =