Friday , December 15 2017
Home / गुन्हेगारी / पुण्यात स्लॅब कोसळून ९ जणांचा मृत्यू; बालेवाडीतील घटना

पुण्यात स्लॅब कोसळून ९ जणांचा मृत्यू; बालेवाडीतील घटना

पुणे न्यूज नेटवर्क : बालेवाडी येथील इमारतीचे बांधकाम चालू असताना अचानक स्लॅब कोसळल्यामुळे 9 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.  ही घटना आज (शुक्रवार) सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली आहे.

बालेवाडी भागात पार्क एक्सप्रेस फेज 2 या गृहप्रकल्पाचे बांधकाम सुरु आहे. या इमारतीच्या 14 व्या मजल्याचा स्लॅब भरण्याचे काम करत असताना सकाळी ही घटना घडली.

या घटनेमध्ये 15 जण जखमी असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अग्निशामक दलाच्या 4 गाड्या आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत.

जखमी आणि मृतांना औंध हॉस्पिटल येथे हलवण्यात आले आहे.

 

Slab collapes pune (3)

 

 

 

Check Also

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

3 + thirteen =