Wednesday , August 15 2018
Home / गुन्हेगारी / प्रेमात पळून जावुन लग्न करायचा विचार करताय… सावधान! पुढे धोका आहे.…

प्रेमात पळून जावुन लग्न करायचा विचार करताय… सावधान! पुढे धोका आहे.…

लग्नाच्या आमिषाने केली जातीये फसवणूक…

मुलगी गर्भवती राहिल्यावर तिला वा-यावर सोडून दिले जातेय…

समाजात अब्रू जाण्याच्या भीतीने पालकही जबाबदारी झटकतायत…

Love-Marriage

वीरेश आंधळकर (पुणे न्यूज) : प्रेमाच्या अथांग सागरामध्ये ‘सैराट’ होउन वाहत गेल्यावर बाहेरील जगाच काहीच देंणघेण राहत नाही. आपले आई-वडीलच शत्रु वाटु लागतात. पण काही वेळा प्रेमात पुढे जावुन अशी काही फसगत होते की शेवटी जीवच नकोसा होतो. अशीच एक धक्कादायक घटना चाकणमध्ये घडली आहे. पाच महिन्याचे बाळ पोटात असताना कालपर्यंत ज्यांने प्रेम केले, आयुष्य सोबत घालावण्याच्या अनाभाका घेतल्या, तो आज बायको म्हणून स्विकारायला तयार नाही. तर आई-बाप ‘मुलगी’ म्हणून घरात घ्यायला तयार नाहीत.

प्रेमामधे फसगत झालेली मुलगी बीएसस्सी झालेली असून मुळची नांदेड येथील आहे. तर मुलगा यवतमाळचा आहे. दोघेही एका ठिकाणी कामाला असताना ओळखीचे रूपांतर पुढे प्रेमामधे झाले. मुलीच्या घरचा विरोध असल्यामुळे दोघांनी पळून जाऊन लग्न करण्याचे ठरवले. चाकण येथे आल्यानंतर लग्न न करता एकत्र राहत असताना पुढे तो तिला सतत ‘शरीर संबंध’ ठेवण्याची मागणी करू लागला. परंतु लग्न झाल्याशिवाय आपण असे काही करणार नाही, म्हणत मुलगी विवाहाच्या आधी शरीर संबंधासाठी नाही म्हणतं राहिली. त्यामुळे एका मंदिरामध्ये देवाच्या समोर दोघांनी लग्न केले. काही दिवस उलटून गेल्यानंतर मुलगी गरोदर राहिली. आपल्या मुलीने लग्न केले असुन तिला मुल होणार आहे हे कळल्यावर आई वडील आपल्या मुलीचा प्रेम विवाह स्विकारण्यास तयार झाले. घरच्यांनी स्विकारण्यास तयारी दाखवल्यामुळे मुलाने मुलीला तिच्या घरी नेउन सोडले आणि लवकरच आपण सगळ्याच्या साक्षीने पुन्हा एकदा लग्न करु म्हणून सांगुन गेला.

परंतु चार महिने झाले तरी मुलगा लग्नाबद्दल सतत कारणे देवुन टाळत राहिला.  एक दिवस मुलाने संगितले की तुला जर माझ्याबरोबर यायचे असेल तर वडीलांकडून  8 लाख रूपए हुंडा म्हणून आन. “घरच्यांचा विरोध असताना ही मी तुझ्या बरोबर आले, आपण आधीच लग्न केले आहे आणि मी तुझ्या बाळाची आई होणार आहे. मुलीने एवढे बोलुन देखीलही मुलगा 8 लाख रूपए दयावेच लागतील म्हणत राहिला. ह्यासर्व प्रकारामुळे मूलगी पूर्णत: हादरुन गेली आहे.  मुलगी गरोदर असल्यामुळे आई वडिलांनी समाजात काय तोड़ दाखवायच म्हणून मुलीलाच घरा बाहेर काढले आहे. एका बाजुला मुलगा फ़ोन स्विच ऑफ करुन गायब झाला आहे. तर दूसरीकडे  आई-वडील साथ देईनात. मुलीची हालत इतकी खराब झाली की तिला अशक्तपणा आला आहे. अन्न पाण्याविना ती पोलिसांनकडे चकरा मारत आहे. चक्कर येवून ती पोलिस स्टेशन पुढेच एका झाडाखाली पडली. हि माहिती मिळताच चाकणमधील सामाजिक कार्यकर्त्या  रूपाली वानखेडे आणि काही महिलांनी तिला दवाखाण्यात दाखल केले.

पोलिसांनी या प्रकारानामध्ये फक्त भा.द.वी कलम 498 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सर्वात चीड येणारी गोष्ठ म्हणजे पोलिस बघ्याची भूमिका घेत आहेत. तर ह्या मुलीची फसवणुक करणारा मुलगा 22 तारखेला यवतमाळमध्ये हुंडा देणाऱ्या मुलीशी लग्न करणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्या  रूपाली वानखेडे यांनी दिली.

Check Also

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

2 × 2 =