Monday , November 20 2017
Home / ठळक बातमी / ‘भाजप’च्या या महिला आमदाराची सोशल मिडीयावर जोरदार चर्चा…(Photo Gallery)

‘भाजप’च्या या महिला आमदाराची सोशल मिडीयावर जोरदार चर्चा…(Photo Gallery)

पुणे न्यूज नेटवर्क : आसाम राज्यात नुकत्याच विधानसभा निवडणूका पार पडल्या आहेत. बतद्रोवा विधानसभा मतदार संघातून निवडून आलेल्या ‘भाजप’च्या महिला आमदार अंगूरलता डेका या सध्या सोशल मिडीयावर चर्चेचा विषय ठरल्या आहेत.

अंगूरलता डेका या सिनेअभिनेत्री असून त्यांनी अनेक बंगाली आणि आसामी सिनेमांमध्ये काम केले आहे. चित्रपट सृष्टीतून राजकारणात आलेल्या अंगूरलता डेका यांनी पहिल्याच प्रयत्नात यश मिळविले आहे. अंगूरलता डेका यांनी कॉंग्रेसच्या गौतम बोरा यांचा पराभव केला आहे.

मात्र सध्या अंगूरलता डेका या चर्चेत आहेत त्या त्यांच्या फोटोंमुळे. रात्रीच्या वेळी स्विमिंगपुल मध्ये दारू पार्टी करतानाचे त्यांचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत. त्याचबरोबर अंगूरलता या चित्रपट सृष्टीत असतानाचे त्यांचे विविध फोटोसुद्धा व्हायरल होत आहेत. विरोधक आता त्यांच्यावर सडकून टिका करत आहेत.

 

 

Check Also

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

sixteen − four =