Wednesday , August 15 2018
Home / गुन्हेगारी / भाडेकरुंच्या माहितीची पोलीस पडताळणी आता ऑनलाईन

भाडेकरुंच्या माहितीची पोलीस पडताळणी आता ऑनलाईन

onlice-police-verification

पुणे, दि. 9 डिसेंबर : पुणे पोलीसांनी आता ऑनलाईन जगात आणखीन एक पाऊल टाकले आहे. आधी ऑनलाईफ एफआयआर आणि आता भाडेकरुंचे पोलीस व्हेरिफिकेशन ऑनलाईन करण्यात आले आहे. नागरिकांना घरबसल्या नवनवीन सुविधा देण्याच्या दृष्ठीने पुणे पोलीस तत्पर दिसत आहेत.

पुणे शहराच्या वाढत्या लोकसंख्येमध्ये परगावहून येणा-या व्यक्तींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थी, व्यवसायिक, कामगार यांची संख्या जास्त असून यातील बहुतांश जण भाडेतत्वार राहतात. सुरक्षिततेच्या दृष्ठीने पोलीस घरमालकांकडून भाडेकरुच्या माहितीचे संकलन करतात. यासाठी घरमालकांना भाडेकरुंचे पोलीस व्हेरिफिकेशन आवश्यक असते. मात्र वारंवार पोलीस स्टेशनच्या चकरा मारणे अथवा पोलीसांना सामोरे जाण्यास नागरिक तयार होत नाहीत. म्हणूनच पुणे पोलीसांनी आता डिजीटल माध्यमांचा वापर करत ऑनलाईन सुविधेमार्फत पोलीस व्हेरिफिकेशन करण्यावर भर दिला आहे.

www.punepolice.co.in या वेबसाईटवर Tenant Information Form हा टॅब नव्याने सुरु करण्यात आला आहे. या टॅबचा वापर करुन केवळ एकच ऑनलाईन फॉर्म भरुन घरमालक आपले पोलीस व्हेरिफिकेशन करु शकणार आहेत. मात्र फॉर्ममध्ये दिलेली माहिती पोलीसांना संशयास्पद वाटली तर मग पोलीस स्वत: त्या ठिकाणी जाऊन पडताळणी करणार असल्याची माहिती आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त दिपक साकोरे यांनी दिली. पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शाखा उपायुक्त गणेश शिंदे यांच्या देखरेखीखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. AeroNube कंपनीचे पंकज घोडे आणि अविराज मराठे हे यासाठी सहाय्य करत आहेत.

Check Also

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

four × 4 =