Wednesday , July 26 2017
Home / ठळक बातमी / महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक

विद्यार्थी केंद्रीत रचना निर्णयप्रक्रियेतील सहभाग वाढविणार

महाविद्यालयीन विदयार्थी निवडणूका पुन्हा सुरु होणार

पसंतीवर आधारित श्रेयांक पध्दती लागू होणार

परिणामकारक तक्रार निवारण व्यवस्था

शिक्षण क्षेत्रातील अनिष्ठ रुढी व पद्धतींना आळा

उच्चशिक्षण व्यवस्थेतील नफाखोरी गैरव्यवहारांना आळा

सामाजिक आरक्षणाच्या टक्केवारीत वाढ

eduacation12

मुंबई दि.९ डिसेंबर : महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत करण्यात आल्यानंतर रात्री विधानपरिषदेतही या विधेयकाला एकमताने समंती देण्यात आली. या विधेयकाचे आता कायद्यामध्ये रुपांतर झाले आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी हे विधेयक विधानसभेनंतर विधानपरिषदेमध्ये मांडले. 21 सदस्यीय संयुक्त समितीने केलेल्या शिफारशी आणि दुरुस्त्यांचा अहवाल विधानसभेत मांडण्यात आला होता. संयुक्त समितीने प्रस्तावित विधेयकात 56 शिफारशी आणि सूचना मांडल्या होत्या. या सर्व शिफारशी स्वीकारुन आज विधानसभेत परिपूर्ण विधेयक समंत करण्यात आले. त्यानंतर हे विधेयक श्री.तावडे यांनी विधानपरिषदेमध्ये मांडले. विधानपरिषदे मध्येही विधेयकाला एकमताने समंती देण्यात आली. संयुक्त समितीचे सदस्य सतेज पाटील यांनी हे विधेयक समंत केल्याबददल उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. तावडे यांचे अभिनंदन केले. सभागृहातील सदस्यांनीही या अभिनंदाला पाठींबा दिला.या विधेयकामुळे राज्याच्या उच्च शिक्षणाला अधिक गती मिळणार आहे व संपूर्ण देशात महाराष्ट्र अग्रेसर राज्य म्हणून ओळख निर्माण करेल असा विश्वास व खात्री श्री. विनोद तावडे यांनी यावेळी व्यक्त केला.

 

 

Check Also

भाडेकरुंच्या माहितीची पोलीस पडताळणी आता ऑनलाईन

पुणे, दि. 9 डिसेंबर : पुणे पोलीसांनी आता ऑनलाईन जगात आणखीन एक पाऊल टाकले आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

11 − 8 =