Monday , November 20 2017
Home / ठळक बातमी / महावितरणमधील लेखी परिक्षेत पात्र उमेदवारांची यादी संकेतस्थळावर जाहीर…

महावितरणमधील लेखी परिक्षेत पात्र उमेदवारांची यादी संकेतस्थळावर जाहीर…

महावितरणमधील तांत्रिक – अतांत्रिक पदांची भरती

MSEB CALL CENTER

मुंबई, दि. 30 मे 2016 : महावितरणमधील तांत्रिक आणि अतांत्रिक पदांसाठी 5 मे आणि 6 मे रोजी घेण्यात आलेल्या लेखी परिक्षेतील पात्र उमेदवारांची यादी महावितरणचे अधिकृत केतस्थळ www.mahadiscom.in यावर जाहीर करण्यात आली असून अशा पात्र उमेदवारांच्या मुलाखती येत्या 7 ते 9 जून दरम्यान मुंबईत घेण्यात येणार आहे.

 

महावितरणच्या वतीने विविध तांत्रिक आणि अतांत्रिक पदांसाठी 5 व 6 मे ला अत्यंत पारदर्शकपणे विविध ठिकाणी लेखी परिक्षा घेण्यात आली होती. या परिक्षेत गुणवत्तेच्या आधारे पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखतीचा संपूर्ण कार्यक्रम महावितरणच्या संकेत स्थळावर जाहीर करण्यात आला आहे.

 

लेखी परिक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांनी निश्चित केलेल्या दिवशी पदाकरिता केलेल्या ऑनलाईन अर्जाची प्रत आणि त्यातील माहितीच्या अनुषंगाने सर्व पुरक मुळ कागदपत्रे तसेच या कागदपत्रांच्या साक्षांकित प्रतींसह मुलाखतीस उपस्थित राहणे आवश्यक आहे. या बाबत संबंधित उमेदवारांना त्यांच्या ई-मेल व एस.एम.एस द्वारे कळविण्यात आलेले आहे.

लेखी परिक्षा व व्यक्तिगत मुलाखतीतील गुणवत्तेच्या आधारे व संबंधित पदासाठी असलेले आरक्षण विचारात घेऊन अर्हतेसंबंधीच्या पडताळणीच्या अधीन राहून पात्र ठरलेल्या उमेदवारांची अंतिम यादी घोषित करण्यात येईल.

 

Check Also

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

fourteen − 3 =