Sunday , September 23 2018
Home / ठळक बातमी / मानवतावादी राज्यघटनेतून डॉ. आंबेडकरांनी भारत ‘राष्ट्रा’ची निर्मिती केली – डॉ. कोत्तापल्ले

मानवतावादी राज्यघटनेतून डॉ. आंबेडकरांनी भारत ‘राष्ट्रा’ची निर्मिती केली – डॉ. कोत्तापल्ले

सेनापती बापट मार्गावरील महावितरणच्या प्रकाशभवनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीच्या कार्यक्रमात माजी कुलगुरु डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. यावेळी डावीकडून डॉ. शैलेश त्रिभुवन, मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे, डॉ. कोत्तापल्ले, कवी उद्धव कानडे, अधीक्षक अभियंता श्री. महेंद्ग दिवाकर व श्री. सुनील पावडे.

पुणे, दि. 11 : स्वातंत्र्यपूर्वीच्या काळात भारत कधीही राष्ट्र नव्हते. त्यामुळे मोजक्या संख्येतील इंग्रजांनी सत्ता गाजवली. सत्ताधार्‍यांमध्ये विखुरलेल्या भारताचे स्वातंत्र्यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवतावादी राज्यघटनेतून खर्‍या अर्थांने एकसंघ राष्ट्र झाले आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व माजी कुलगुरु डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी सोमवारी (ता. 11) केले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीनिमित्ताने महावितरणच्या पुणे परिमंडलाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सेनापती बापट मार्गावरील प्रकाशभवन येथे आज महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले व दि. 14 एप्रिलपर्यंत आयोजित विविध कार्यक्रमांना प्रारंभ झाला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील संस्मरणीय प्रसंगातील छायाचित्र प्रदर्शनी व ग्रंथ प्रदर्शनाचे उद्‌घाटन डॉ. कोत्तापल्ले यांच्याहस्ते झाले. त्यानंतर ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची समतेची लढाई’ या विषयावर डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे उपस्थित होते. साहित्यिक डॉ. शैलेश त्रिभुवन व कवी उद्धव कानडे यांनी डॉ. कोत्तापल्ले यांची प्रकट मुलाखत घेतली.

B G Associates

डॉ. कोत्तापल्ले म्हणाले, की सरंजामी व जाती व्यवस्थेमुळे माणूस म्हणून समता व न्याय यांचे अस्तित्वच नव्हते. सर्वंच नागरिकांना माणूस म्हणून समान अधिकार, न्याय व बंधुत्वाने जगता यावे म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जात, धर्म व लिंगभेद विरहित मानवतावादी राज्यघटना तयार केली आहे. धर्मावर आधारित राष्ट्राची उभारणी शक्य नाही आणि तसे प्रयत्न झाल्यास देश पुन्हा जातीव्यवस्थेच्या गुलामगिरीत जाईल, असे मत डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी व्यक्त केले. यावेळी मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे यांनी मनोगत व्यक्त केले तसेच श्री. विवेकानंद दिवाकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी झालेल्या प्रत्यक्ष भेटी व सहवासाच्या आठवणी सांगितल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधीक्षक अभियंता श्री. महेंद्ग दिवाकर यांनी केले. लेखा अधिकारी श्री. अजित पानसे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) श्री. आलोक गांगुर्डे, अधीक्षक अभियंता सर्वश्री सुंदर लटपटे, सुनील पावडे, रमेश मलामे, सुभाष ढाकरे, संजीव भोळे, अरुण थोरात, श्री. बाबर, सहाय्यक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) श्री. धैर्यशील गायकवाड, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. रामगोपाल अहिर आदींसह महावितरणमधील विविध संघटनांचे पदाधिकारी, अभियंते, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Check Also

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

3 × 4 =