Sunday , September 23 2018
Home / ठळक बातमी / मुंबईहून विमानाने पुण्याला येणा-या कन्हैयाकुमारवर हल्ल्याचा प्रयत्न;

मुंबईहून विमानाने पुण्याला येणा-या कन्हैयाकुमारवर हल्ल्याचा प्रयत्न;

पुण्यात कन्हैयाच्या सभेसाठी पोलीसांचा तगडा बंदोबस्त…

kanhaiya attack in plan
कन्हैयावर हल्ला करणा-या व्यक्तीला पोलीसांनी ताब्यात घेतले

पुणे न्यूज, दि. 24 एप्रिल : जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमारवर मुंबईमध्ये हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे. कन्हैया प्रवास करत असलेल्या विमानात एका व्यक्तीने त्याचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या विमानात हा हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे. सुदैवाने कन्हैया सुखरुप आहे.

पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात आज दुपारी 4 वाजता कन्हैयाची सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यापार्श्वभुमीवर बालगंधर्व रंगमंदिराच्या परिसरात एक पोलीस उपायुक्त, दोन सहायक आयुक्त, आठ पोलीस निरीक्षक, बावीस सहायक निरीक्षक, १२० पोलीस शिपाई, दहा महिला पोलीस शिपाई, शीघ्र कृती दलाच्या दोन तुकडय़ा आणि वज्र पथक असा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पुणे विमानतळावर आगमन झाल्यापासून कन्हैया कुमारला पोलीस बंदोबस्त देण्यात येणार आहे. त्याचबरोबर सभास्थानी संभाव्य अनुचित घटना टाळण्यासाठी बालगंधर्व रंगमंदिराच्या परिसरात बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

JNU_Kumar

पुरोगामी विद्यार्थी युवक संघर्ष समितीतर्फे कन्हैया कुमार याची पर्वती पायथा येथील साने गुरुजी स्मारक येथे सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, सभेसाठी ते ठिकाण योग्य नसल्याचे संयोजकांना सांगण्यात आले. त्यामुळे संयोजकांना बालगंधर्व रंगमंदिर येथे सभेचे आयोजन करावे लागले.

Check Also

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

4 + 15 =