Monday , November 20 2017
Home / क्रीडा / मुलांप्रमाणे मुलींनीदेखील क्रिकेट खेळावे – सचिन

मुलांप्रमाणे मुलींनीदेखील क्रिकेट खेळावे – सचिन

बारामतीतील क्रिकेट स्टेडियमचे सचिनच्या हस्ते उद्घाटन…

Sachin

बारामती : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या हस्ते आज बारामतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमचं उद्घाटन झाले आहे. सचिनला पाहण्यासाठी यावेळी मोठ्या संख्येने चाहत्यांनी गर्दी केली होती. टीम इंडियाचा स्टाईलिश फलंदाज अजिंक्य रहाणेही बरोबरच यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होते.

B G Associates

अनेक सुविधांनी सज्ज असलेलं हे स्टेडियम मुंबईच्या वानखेडे स्टेडियमच्या पेक्षा मोठं आहे. त्यामुळे इथंही लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जाचे सामने होतील, अशीही शक्यता वर्तवली जाते आहे. सचिनने औपचारिकरित्या या स्टेडियमचं उद्घाटन केले.

उद्घाटनप्रसंगी सचिन म्हणाला की, “मुलांबरोबर मुलींनीदेखील क्रिकेट खेळावे. बारामतीत तरुणाई आहे, ते डायमंड आहेत, त्यांना पॉलिश करण्यासाठी गाईड असतात.

स्टेडीयमच्या लोकार्पणानंतर मुंबई विरुद्ध महाराष्ट्र या संघात सामना रंगला.

 

 

Check Also

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

14 − 10 =