Wednesday , August 15 2018
Home / क्रीडा / मेरी अॅन गोम्स आणि अभिजित गुप्ता ठरले एमसीएल २०१६ चे सर्वोत्तम खेळाडू

मेरी अॅन गोम्स आणि अभिजित गुप्ता ठरले एमसीएल २०१६ चे सर्वोत्तम खेळाडू

 

Aniruddha Deshpande (L) presenting the Best Player Men Award 2016 to Abhijit Gupta (R)
Aniruddha Deshpande (L) presenting the Best Player Men Award 2016 to Abhijit Gupta (R)

 

पुणे न्यूज नेटवर्क : मेरी अॅन गोम्स आणि अभिजित गुप्ता यांना महाराष्ट्र चेस लीग २०१६ च्या सर्वोत्तम खेळाडूचा किताब देण्यात आला. शेवटच्या फेरीत पुणे सांगली नेव्हीगेटर्सच्या भास्करन आदिबन याने जळगाव  बॅटलर्सच्या सुनीलदत्त नारायणचा धुव्वा उडविला. या वर्षी लीग मध्ये पुणे ट्रू मास्टर्स संघाने तिसरा क्रमांक तर जळगाव बॅटलर्स यांनी दुसरा क्रमांक पटकाविला. एमसीएलच्या ऑर्गनायझिंग कमिटीचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे यांच्या हस्ते खेळाडूंना पारितोषिके वितरीत करण्यात आली. या वेळी पीडीसीसीचे खजिनदार निरंजन गोडबोले, पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष विजय भावे, बँक ऑफ महाराष्ट्रचे असिस्टंट जनरल मॅनेजर रविंद्र चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

 

Pune-Sangali Navigators accepting their Trophy & winning cheque of Maharashtra Chess League 2016
Pune-Sangali Navigators accepting their Trophy & winning cheque of Maharashtra Chess League 2016

मेरी अॅन गोम्स आणि अभिजित गुप्ता यांना प्रत्येकी रोख १०,००० रुपये आणि चषक देवून गौरविण्यात आले. तर विजेत्या संघाला रुपये ३ लाख रोख आणि चषक देऊन गौरविण्यात आले. दुसऱ्या क्रमांकाच्या जळगाव बॅटलर्सला १.७५ लाख रोख रक्कम आणि चषक देवून सन्मानित करण्यात आले. तसेच तिसऱ्या क्रमांकाच्या पुणे ट्रू मास्टर्स संघाला चषक देण्यात आला. याशिवाय सर्वोत्कृष्ट डग आउट डिझाईनसाठीचा पुरस्कार आरबीएस अहमदनगर चेकर्स या संघाला देण्यात आला.

Pune-Sangali Navigators celebrating their win of Maharashtra Chess League 2016
Pune-Sangali Navigators celebrating their win of Maharashtra Chess League 2016

Check Also

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

two × 2 =