Wednesday , August 15 2018
Home / ठळक बातमी / रामकृष्ण मठातर्फे रामनवमी उत्सवाचे आयोजन

रामकृष्ण मठातर्फे रामनवमी उत्सवाचे आयोजन

Vijay Koparkarपुणे, ७ एप्रिल: पुण्यातील रामकृष्ण मठातर्फे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्रीराम नवमी उत्सवाचे आयोजन केले जाणार आहे. तसेच मठातील मंदिराला १४ वर्षे झाल्याच्या निमित्ताने एका तीन दिवसीय संगीत महोत्सवाचे देखील आयोजन करण्यात येणार आहे. सोमवार, दि. ११ एप्रिल ते बुधवार दि. १३ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वा. हा महोत्सव मठाच्या आवारात होईल.

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी (११ एप्रिल)ग्वाल्हेर घराण्याचे अतुल खांडेकर यांचे गायन होईल. अतुल खांडेकर डॉ. वीणा सहस्रबुद्धे यांचे शिष्य असून ते त्यांच्या गंधर्व गायकीसाठी प्रसिद्ध आहेत. दुसऱ्या दिवशी (१२ एप्रिल) किराणा घराण्याचे सुप्रसिद्ध गायक पंडित कैवल्यकुमार यांच्या सुश्राव्य गायकीचा प्रेक्षकांना आस्वाद घेता येईल. तर शेवटच्या दिवशी (१३ एप्रिल) महोत्सवाचा शेवट विजय कोपरकर यांच्या गायनाने होईल.

B G Associates

याशिवाय रामनवमीच्या निमित्ताने शुक्रवार, दि. १५ एप्रिल रोजी मंदिरात परम पू स्वामी गौतमनंदजी महाराज, प्रमुख विश्वस्त, रामकृष्ण मिशन आणि अध्यक्ष रामकृष्ण मठ, चेन्नई आणि रामकृष्ण मठाच्या इतर मान्यवरांचे व्याख्यान होईल. तसेच आरती, पूजा, होमहवन, श्रीरामनाम संकीर्तन आणि महाप्रसादाचे देखील आयोजित करण्यात येईल.

सदर कार्यक्रम हे निशुल्क असून सर्वांसाठी खुले आहेत, तरी भक्तगणांनी याचा जरूर लाभ घ्यावा.

Check Also

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

18 − three =