Monday , November 20 2017
Home / ठळक बातमी / लंगड्या म्हणून आमची अवहेलना केली जातेय; अपंग बांधवांचा “सैराट” विरोधी सूर…

लंगड्या म्हणून आमची अवहेलना केली जातेय; अपंग बांधवांचा “सैराट” विरोधी सूर…

IMG_20160514_142932

पुणे न्यूज नेटवर्क : चित्रपट हे मनोरंजनाबरोबरच समाज प्रबोधनाचं काम  करतात. आपला समाज अनुकरण प्रिय असल्यामुळे चित्रपटातील गोष्टीच अनुकरण केल जाते.  चित्रपटातील  विनोदी संवादामुळे कोणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घेतली जाणे गरजेचे आहे. “सैराट” या गाजत असलेल्या मराठी चित्रपटामधे तानाजी गलगुंडे याने ‘प्रदीप’ या नायकाच्या मित्राची भूमिका केली आहे. यामध्ये प्रदीप हा अपंग मुलगा असतो. त्याची भूमिका ही भावस्पर्शी आहे.  परंतु सैराटमधे अठरा ते वीस वेळा त्याला ‘लंगड्या’ म्हणून संबोधत त्याच्या व्यंगाची चेष्टा करण्यात आली आहे. ही गोष्ठ खेदजणक असुन यामुळे समाजामध्ये अपंग व्यक्तींची चेष्टा करण्याचे प्रकार वाढत असल्याचा आरोप प्रहार अपंग संघटनेकडून करण्यात येत आहे.

tanaji galgunde sairat

चित्रपटामधुन ‘लंगड्या’ हा शब्ध काढून टाकण्यात यावा अशी मागणी प्रहार अपंग संघटनेकडून करण्यात येत आहे. तसेच प्रहार अपंग संघटना सैराट नागराज मुंजेळे यांचा निषेध करत असल्याची माहिती धर्मेन्द्र सातव यांनी प्रहार अपंग संघटनेच्या वतीने दिली.

Check Also

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

thirteen + twenty =