Monday , October 23 2017
Home / ठळक बातमी / वयाच्या 48 व्या वर्षी 48% गुण मिळवून दहावी उत्तीर्ण…

वयाच्या 48 व्या वर्षी 48% गुण मिळवून दहावी उत्तीर्ण…

पुणे अग्निशमन दलातील फायरमनचे यश…

 

पुणे न्यूज नेटवर्क : पुणे अग्निशमन दलातील 48 वर्षीय  फायरमन सुभाष प्रभाकर जाधव यांनी वयाच्या 48 व्या वर्षी दहावीत यश मिळविले आहे. त्यांना दहावीच्या परिक्षेत 48.60% गुण मिळाले आहेत.

सुभाष जाधव हे कात्रज येथील रहिवाशी आहेत. पुणे अग्निशमन दलामधे ते 4 नोव्हेंबर 1991 रोजी मध्ये फायरमन या पदावर रुजू झाले. 2004 मधे एन.सी.एल, पाषाण येथे लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवित उत्कृष्ठ कामगिरी केल्याबद्दल “राष्ट्रपती शौर्य पदक” या मानचिन्हाने त्यांना गौरविण्यात आले.

अग्निशमन दलामधे बढती मिळवण्यासाठी व शिक्षणाची ओढ निर्माण झाल्याने 17 नंबरचा फॉर्म भरून प्रवेश घेतला. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथे परीक्षा दिली.  48 व्या वर्षी दहावी उत्तीर्ण झाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

 

Check Also

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

eighteen − 14 =