Monday , November 20 2017
Home / गुन्हेगारी / वहिनीवरील रागातून ‘त्या’ने सात दुचाकी जाळल्या!

वहिनीवरील रागातून ‘त्या’ने सात दुचाकी जाळल्या!

पुण्यातील उत्तमनगर येथील वाहन जळीतकांडप्रकरणी एकाला अटक…

Vehicles Fire-Pune

पुणे न्यूज : उत्तमनगर येथे झालेल्या वाहन जळीतकांडप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. घरगुती वादातून सात दुचाकी वाहने जाळली जाळल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. रमेश शिंदे असे या आरोपीचे नाव आहे. रमेशने वहिनीवरच्या रागातून हे कृत्य केल्याचे तपासात उघड झाले आहे.

काल (रविवार) पहाटे आरोपीने पुण्यातील उत्तमनगरमधील मोरया पेट्रोलपंपाच्यापाठीमागील सोसायटीच्या पार्किंगमधील पाच दुचाकी पेटवून दिल्या. तक्रारदार महिला राधिका शिंदे यांच्या दिरानेच घरगुती वादातून दुचाकी जाळल्याचे समोर आले आहे.

राधिका शिंदे यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर 12 तासात पोलिसांनी आरोपीचा छडा लावला. मध्यरात्री पोलिसांनी आरोपी रमेश शिंदेला अटक केली आहे. मागील महिन्यात याच ठिकाणी वाहन जळीतकांडाची घटना घडली होती. यामध्ये रमेशनेचा सहभाग आहे का? याची पोलीस चाचपणी करत आहेत.

Check Also

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

20 − 3 =