Sunday , September 23 2018
Home / गुन्हेगारी / विमा मिळवण्यासाठी त्याने केला ‘स्वत:च्या’ खूनाचा बनाव.

विमा मिळवण्यासाठी त्याने केला ‘स्वत:च्या’ खूनाचा बनाव.

Murder at ambegaon pathar

 

पुणे न्यूज़ नेटवर्क – दोन दिवसांपूर्वी आंबेगाव पठारवर अर्धवट जळालेला एक मृतदेह आढळून आला होता. मृतदेह जळालेला असल्यामुळे मृत व्यक्तिची ओळख होउ शकत नसताना ही या खुनाचा छडा लावण्यात भारती विद्यापीठ पोलिसांना यश आले आहे. दरम्यान तपास करत असताना विम्याचे पैसे मिळावे यासाठी स्वतःच्याच खुनाचा बनाव या आरोपीने केला असल्याचे उघड झाले आहे. यासाठी त्याने मित्राचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
अविनाश मरळ (वय 25 वर्ष रा. जनता वसाहत) असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून सतीश बाबू भालेराव (वय 35 रा. अपर इंदिरानगर बिबवेवाडी) असे हत्या केलेल्या आरोपीचे नाव आहे.

सतीश भालेराव हा मयताला दांडेकर पुलावरून सोबत घेऊन आंबेगाव येथे गेला. आणि त्याच्या डोक्यात दगड घालत खून करण्यात आला. मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून तोंडावर पेट्रोल ओतून मृतदेह जाळण्यात आला. आरोपीने मृताचे कपडे काढून जाळून टाकले आणि त्यांनतर स्वतःचे कपडे मृतदेहावर चढवले, त्याच्या खिशात स्वतःची ओळख असणारी कागदपत्रे ठेवली. अश्या प्रकारे एखाद्या चित्रपटाच्या स्टोरी प्रमाणे स्वतःचा खून केल्याचा बनाव भालेराव याने रचला. कर्जबाजारीपणामुळे हे कृत्य केल्याचे पोलिसांच्या तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आसुंन पुढील तपास चालु आहे.

Check Also

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

13 + 7 =