Sunday , September 23 2018
Home / ठळक बातमी / वीजदर वाढीचे आरोप गैरसमज व ग्राहकांशी दिशाभूल करणारे – महावितरण

वीजदर वाढीचे आरोप गैरसमज व ग्राहकांशी दिशाभूल करणारे – महावितरण

MSEB

मुंबई, दि. 10 मार्च 2016:- वीजदर वाढीचा प्रस्ताव महावितरणने वीज नियामक आयोगाकडे नुकताच सादर केला असून यावेळचे वीजदर साधारणातः 20 टक्क्यांनी वाढणार अशा आशयाच्या बातम्या काही वृत्तपत्रांमध्ये ठळकपणे प्रसिध्द झालेल्या आहेत. सदर बातम्या वस्तुस्थितीचा विपर्यास करूंन ग्राहकांची दिशाभूल करणार्‍या असून जनमाणसात महावितरणबाबत विनाकारण गैरसमज पसरविणार्‍या आहेत. याबाबत महावितरणतर्फे खालीलप्रमाणे खुलासा करण्यात येत आहे.

बहुवार्षिक वीजदर अधिनियम-2015 नुसार महावितरणने 2014-15 या वर्षाचे अंतिम समायोजन, 2015-16 वर्षाचे अंतरिम समायोजन आणि 2016-17 ते 2019-20 या 4 वर्षांकरिता बहुवार्षिक वीजदर प्रस्ताव वीज नियामक आयोगाकडे नुकताच सादर केलेला आहे. महावितरणच्या या प्रस्तावाची तांत्रिक वैधता व विविध ठिकाणी होणार्‍या ग्राहकांच्या सुनावणीमधून येणार्‍या मुद्यांच्या आधारावर आयोगाद्वारे अंतिम निर्णय घेण्यात येत असतो. या सर्व बाबी अजून व्हायच्या असताना आताच वीजदर वाढीबाबत विधान करणे हे अनाकलनिय असून ग्राहकांची दिशाभूल करणारे आहे.

महावितरणने दाखल केलेल्या प्रस्तावात भविष्यातील वीज खरेदीचे नियोजन केले असल्याने इंधन समायोजन आकार मोठ्या प्रमाणात वाढण्याची भीती अनाठायी आहे. विविध घटकांच्या आधारावर बदलणार्‍या इंधनाचे दर त्या-त्या वेळी किती असतील, हे सांगता येत नसताना देखील आताच इंधन समायोजन आकारामुळें वीजदर 12 ते 13 टक्क्यांनी वाढतील हे कोणत्या आधारावर गृहीत धरण्यात येत आहे, हेही न समजण्यासारखे आहे.

वीजदर वाढीबाबतची प्रक्रिया अजून प्राथमिक पातळीवर असताना अवाढव्य वीजदर वाढीच्या बातम्यांवर जनतेने विश्वास ठेऊ नये, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे.

Check Also

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

9 + 2 =